Home /News /mumbai /

Mumbai News: धक्कादायक! लस शिल्लक नसल्याचं सांगत 80 वर्षांच्या वृद्धेला परत पाठवलं; मुंबईतील घटना

Mumbai News: धक्कादायक! लस शिल्लक नसल्याचं सांगत 80 वर्षांच्या वृद्धेला परत पाठवलं; मुंबईतील घटना

Mumbai Vaccination: Covid-19 लसीचा तुटवडा निर्माण झाल्यावरून केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी लसीकरण केंद्रं बंद करण्यात आली आहेत.

    मुंबई, 10 एप्रिल: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना प्रतिबंधक लसीचा (Corona Vaccine) तुटवडा निर्माण झाल्याचा फटका नागरिकांना बसत असून अनेक ठिकाणी लस शिल्लक नसल्याचे सांगून अगदी वयोवृद्ध नागरिकांना देखील परत पाठवले जात आहे. यामुळं जनतेत नाराजी निर्माण होत आहे. जोगेश्वरी इथं राहणाऱ्या 80 वर्षांच्या वृद्ध महिला जयश्री मानकामे यांनी आपल्याला गोरेगाव इथल्या नेस्को लसीकरण केंद्रावरून (Nesco Vaccination Centre) लस शिल्लक नसल्याचं सांगून परत पाठवण्यात आल्याचं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. त्या म्हणाल्या, "सुरुवातीला मला लस घेण्याची भीती वाटत होती; पण आता अनेक लोकांनी ती घेतल्याचं बघून माझाही लस घेण्याबद्दलचा विश्वास वाढला. त्यामुळं मी लस घेण्यासाठी जोगेश्वरीवरून इथं आले. पण लस मिळालीच नाही."  सरकार लवकरच लसीचा पुरवठा सुरळीत करेल, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. लसीचा तुटवडा निर्माण झाल्यावरून केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून,महाराष्ट्रात काही ठिकाणी लसीकरण केंद्रं बंद करण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) बारा एप्रिलपर्यंत मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रं बंद राहतील मात्र सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू राहील, असं जाहीर केलं होतं. साप्ताहिक टाळेबंदीच्या (Weekend Lockdown) पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्राच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, लस घेण्यासाठी लोक प्रवास करू शकतात, असं प्रशासनानं जाहीर केलं होतं. शनिवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत तर रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत लसीकरण सुरू राहणार असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. वर्षभराने पुण्याने अनुभवली तीच स्तब्धता; गडबजलेली मंडई, लक्ष्मी रस्ता झाला शांत दरम्यान, महाराष्ट्रानं लसींचा तुटवडा असूनदेखील लसीकरणातील आघाडी कायम राखली आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात 97 लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.  शुक्रवारी जवळपास तीन लाख लोकांचे लसीकरण करण्यात आलं आणि शुक्रवारपर्यंत राज्यात लसीचे दहा लाख डोस शिल्लक होते, तर शनिवारीकेंद्राकडून 4.59 लाख डोस प्राप्त झाले असल्याचंही अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. नियम सर्वांसाठी सारखे; कोरोनाच्या गाईडलाईन्स मोडणाऱ्या पंतप्रधानांना लाखोंचा दंड दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry )शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार,लसीकरण मोहिमेच्या 84 व्या दिवशी शुक्रवारी एका दिवसात देशात 32 लाख 16 हजार 949 लोकांचे लसीकरण करण्यात आलं. त्यामध्ये 28 लाख 24 हजार 66 जणांना पहिला डोस तर 3 लाख 92 हजार 883 लोकांना दुसरा डोस देण्यात आला असून, देशात आतापर्यंत 9कोटी 80 लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे.
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus, Mumbai News

    पुढील बातम्या