मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार; अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला मारहाण

उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार; अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला मारहाण

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे

उल्हासनगर, 20 मार्च : अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी गेलेल्या महापालिका मुकादम आणि बांधकाम करणाऱ्यामध्ये जोरदार हाणामारीची घटना उल्हासनगरमध्ये घडल्याची बातमी उघड झाली आहे.

या हाणामारीत उल्हासनगर महापालिकेचे मुकादम प्रकाश साकेत यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात चित्रित झाला असून यामध्ये महापालिकेच्या मुकादमाला मारहाण होताना दिसत आहे. यात मुकादम देखील मारहाण करताना दिसत आहे. मारहाण झाल्यानंतर मुकादम प्रकाश यांच्यासह इतर महापालिका पथकाने उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील शांतीनगर ब्राम्हण पाडा भागात हरेश ब्राम्हणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. हरेश याने राहत्या घरावर आणखी एक माळा (वन प्लस वन )बांधण्याचे काम सुरू केले होते. हे बांधकाम महापालिकेच्या परवानगी विना सुरू असून ते अनधिकृत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामूळे हे बांधकाम बंद करण्यासंबंधी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ब्राम्हणे यांना वारंवार नोटीस देत बांधकाम बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या.

हे ही वाचा-लेटर बॉम्बप्रकरणी नवा ट्विस्ट, मुख्यमंत्री कार्यालयाने मांडला वेगळाच मुद्दा

मात्र तरी देखील इथे बांधकाम सुरू होते. अखेर आज दुपारी हे काम बंद करून साहित्य जप्त करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी गेले होते. यावेळी महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक आणि ब्राम्हणे याच्या कुटुंबातील लोकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. या हाणामारीमुळे मोठा गोंधळ उडाला. यात पुरुष आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यामुळे आरडाओरड आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. दरम्यान या प्रकारानंतर महापालिका पथकाने थेट उल्हासनगर कॅम्प 3 च्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हरेश ब्राम्हणे त्याचा भाऊ आणि  आणि इतर सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मुकादमाने देखील हाणामारी केल्याने आमची देखील तक्रार पोलिसांनी दाखल करून घ्यावी अशी मागणी ब्राम्हणे यांच्या कडून करण्यात आली आहे. या प्रकरणी अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही, मात्र उल्हासनगर शहरात अतिक्रमण पथकावर हल्ला होण्याचा ही पहिलाच वेळ नसून अनेकदा हे प्रकार घडले आहे.

First published:
top videos

    Tags: BMC, Mumbai