मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत धक्कादायक आकडेवारी, पडताळणीतून मिळाली नवी माहिती

मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत धक्कादायक आकडेवारी, पडताळणीतून मिळाली नवी माहिती

विशेष म्हणजे ज्या तरुणी किंवा तरुणांच्यामध्ये स्थूलत्व आणि हैपोथयरॉईड असेल तर त्यांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर पुण्यानंतर राजधानी मुंबईत या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला. मुंबईत आतापर्यंत 7724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत झालेल्या या मृत्यूंची पडताळणी करताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

डेथ ऑडिट कमिटी म्हणजे मृत्यू पडताळणी समितीने एकूण 5800 मृत्यूंची पडताळणी केली. ज्यात असं लक्षात आलं की 31 टक्के मृत्यू हे रुग्णालयात भरती केल्यानंतर 24 तासांच्या आत झालेत. तर 59 टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यानंतर 4 दिवसांच्या कालावधीत झाले आहेत. याचाच अर्थ असा की रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाला खूप उशीरा रुग्णालयात भरती केलं. 31 टक्क्यांच्या बाबतीत तर प्रकृती खालावल्यानंतरच रुग्णांला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यामुळे लक्षण दिसताच डॉक्टरांच्याकडे जाण तर गरजेचं आहेच पण विशेष म्हणजे ज्या तरुणी किंवा तरुणांच्यामध्ये स्थूलत्व आणि हैपोथयरॉईड असेल तर त्यांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.

या 5800 मृत्यूंमध्ये 21 ते 30 या वयोगतामध्ये 101 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूणच 77 टक्के मृतांमध्ये को मोरबीडीटी आढळली आहे. मुंबईकरांच्या जीवनशैलीशी संबंधात असणारे आजार हे त्यामागचं मोठ कारण आहे.

मुंबईतील 5800 मृत्यूंची पडताळणी

31% मृत्यू- रुग्णालयात 24 तासांच्या आत 

59% मृत्यू- रुग्णालयात 4 दिवसात

77% मृतांमध्ये आढळली को-मॉर्बीडिटी

वयोगट - एकूण मृत्यू

0 ते10 वर्षे - 10

11 ते 20 वर्षे- 32

21ते 30वर्षे- 101

31 ते 40 वर्षे- 325

41ते 50 वर्षे- 806

51 ते पुढील- 4536

Published by: Akshay Shitole
First published: September 4, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading