मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Big News : महाराष्ट्रातील IT रेडमध्ये धक्कादायक खुलासा, 1050 कोटींची करचोरी उघड

Big News : महाराष्ट्रातील IT रेडमध्ये धक्कादायक खुलासा, 1050 कोटींची करचोरी उघड

2022 साली कोणत्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) मिळू शकते, तसंच पगारवाढीचं प्रमाण किती असू शकतं याचा अंदाज नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घेण्यात आला.

2022 साली कोणत्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) मिळू शकते, तसंच पगारवाढीचं प्रमाण किती असू शकतं याचा अंदाज नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घेण्यात आला.

महाराष्ट्रात आज आयटीने छापे घातले असताना एकूण 1050 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार (Tax evasion in excess of Rs 1050 crore) (करचोरी) उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 7 ऑक्टोबर : आयकर विभागाने (Income Tax Department) आज महाराष्ट्रातील काही रिअर इस्टेट व्यावसायिकांवर कर चोरीचा (Income Tax Department Raid) आरोप करीत अनेक ठिकाणी छापेमारी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. अधिकृत सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, सातारा आणि गोव्यात छापेमारी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील राजकीय नेत्याच्या सहकाऱ्यांविरोधात केलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही एंट्री ऑपरेटरनादेखील छापेमारीत सामील करण्यात येत आहे.  ( Shocking revelation in IT raid in Maharashtra tax evasion of Rs 1050 crore revealed ) महाराष्ट्रात आज आयटीने छापे घातले असताना एकूण 1050 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार (Tax evasion in excess of Rs 1050 crore) (करचोरी) उघडकीस आल्याची माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. मुंबईतील (Mumbai) ओबेरॉय हॉटेलमधील काही सुइट्स दोन मध्यस्थींनी कायमस्वरूपी भाड्याने घेतले होते. आणि येथे त्यांच्या ग्राहकांना भेटण्यासाठी वापरत होते. याचाही शोध लागला. या छापेमारीत व्यापारी, मध्यस्थी, सहकारी आणि सार्वजनिक कार्यालये असणाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या नोंदींमध्ये विविध कोड नावांचा वापर केला गेला आणि एका प्रकरणात 10 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड होते. या शोधादरम्यान एकूण व्यवहार रु. 1050 कोटीपर्यंतचं असल्याचं समोर आलं आहे. हे ही वाचा-बहिणींच्या कार्यालयात इन्कम टॅक्सची झाडाझडती, अजित पवार म्हणाले... कसा केला तपास.. आयकर विभागाने राज्यातील 25 निवासस्थानी, 15 कार्यालयाच्या परिसरात छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यस्थी हे कॉर्पोरेटर्स आणि उद्योजकांना जमीन वाटपापासून ते सर्व सरकारी मंजुरी मिळवण्यापर्यंत मदत करीत होते. यामधील संवादासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाने अनेक डिजिटल पुरावे हाती लागले आहेत. या छापेमारीत मिळालेल्या दस्तऐवजांमध्ये एकूण मिळणाऱ्या रोख रकमेबाबत माहिती समाविष्ट आहे. आलेली आणि येणाऱ्या रकमेचादेखील यात उल्लेख करण्यात असून प्रत्येकी याचा आकडा 200 कोटीपर्यंत असल्याचंही सांगितलं जात आहे. कोड नावाचा वापर केलेल्या व्यक्तीला ही रक्कम दिली गेल्याचं समोर आलं आहे.
First published:

Tags: Maharashtra, Raid

पुढील बातम्या