मुंबई रेल्वेतील धक्कादायक घटना, बलात्कार करून तरुणीचं डोकं फोडलं आणि चालत्या ट्रेनमधून फेकलं

मुंबई रेल्वेतील धक्कादायक घटना, बलात्कार करून तरुणीचं डोकं फोडलं आणि चालत्या ट्रेनमधून फेकलं

तरुणीला गंभीर जखमा आणि डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. तिला त्वरित वाशीच्या एनएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची प्राथमिक तपासणी करून तिला जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : मुंबईत बलात्काराची भीषण घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्यात फेकण्यात आलं. नवी मुंबईतील वाशी येथील रेल्वे रुळांवर मंगळवारी पहाटे ती गंभीर अवस्थेत आढळली.

मंगळवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास वाशी रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकाने, रेल्वे स्टेशनपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशी पुलाजवळील ट्रॅकवर एक तरुणी आढळल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर जीआरपीचे कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, तरुणी डोक्याला गंभीर जखमा आणि शरीरावरही जखमा असलेल्या अवस्थेत आढळली.

तरुणीला गंभीर जखमा आणि डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. तिला त्वरित वाशीच्या एनएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची प्राथमिक तपासणी आणि उपचार करून तिला जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ती तरुणीने केवळ कसंबसं आपलं नाव सांगू शकली असून, ती टिटवाळा येथे राहणारी असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी टिटवाळा येथे तिच्या कुटुंबाचा शोध घेतला असून ती पवईत नोकरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. विकेंडला ती आपल्या कुटुंबाला भेटायला यायची. रविवारी संध्याकाळी आपल्या घरुन निघून ती पवईत येत होती.

सेक्शन 307 अंतर्गत खूनाचा प्रयत्न आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ठाणे, पनवेल आणि वाशीपर्यंतच्या सर्व स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आले आहेत. सध्या तरुणी ऑक्सिजन सपोर्टवर असून तिचा वैद्यकीय तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. ती शुद्धीत आल्यानंतर पुन्हा तिचा जबाब नोंदवला जाणार आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 24, 2020, 5:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या