धक्कादायक! मुंबईत क्लीनअप मार्शलने रिक्षावाल्यासोबत केलं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! मुंबईत क्लीनअप मार्शलने रिक्षावाल्यासोबत केलं धक्कादायक कृत्य

पोलिसांनी अनिल अशोक तावडे या क्लीनअप मार्शलला अटकही केली आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मार्च : ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, सुरक्षित मुंबई’ या शीर्षकांतर्गत मुंबई महानगरपालिकेने (BMC) क्लीनअप मार्शल ही संकल्पना राबवायला सुरुवात केली होती. पण अगदी पहिल्या दिवसापासूनच क्लीनअप मार्शल वादात सापडू लागले. दंडाच्या नावाखाली क्लीनअप मार्शल मुंबईकरांकडून (Mumbai) एक प्रकारे वसुलीच करु लागले होते. असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल अशोक तावडे या क्लीनअप मार्शलला अटकही केली आहे.

माहिम येथे एका रिक्षावाल्याला क्लीनअप मार्शल अनिल अशोक तावडे यांनी अडवले आणि त्याने क्लीनअप नियंमांचे उल्लंघन केलं, असं सांगून अनिल त्या रिक्षावाल्यावर कारवाई करु लागला. रिक्षावाल्याने विरोध करताच अनिल रिक्षावाल्याला कारवाईची धमकी देत आमच्या वरिष्ठांशी बोल असं सांगून कोपऱ्यात नेले आणि पुढे साहेब आहेत त्यांना भेटायला जाऊयात असं सांगून त्याच्या दुचाकीवर त्या रिक्षावाल्याला बसवून आधी कुर्ला दिशेने नंतर माहिम दिशेने घेवून गेला आणि एका निर्जन स्थळी थांबवून अनिलने त्या रिक्षावाल्याला धमकावायला सुरुवात केली. तसंच त्याच्या जवळील रोख रक्कम 5 हजार खंडणीसारखी उकळली.

रिक्षावाल्याने अनिलला विरोध करताच अनिलने घटनास्थळावरुन पोबारा केला. त्यानंतर रिक्षावाल्याने थेट रिक्षा जिथे उभा केली होती तेथे गेला आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रिक्षावाल्याची तक्रार दाखल करुन घेत अनिलचा शोध सुरु केला आणि अनिलला ताब्यात घेतले.

अनिलची चौकशी केली असता त्याने रिक्षावाल्याकडून खंडणी उकळण्याचे कबूल केले. धक्कादायक म्हणजे अनिलने याआधी देखील अशाच प्रकारे अनेकांना लुटले असल्याचे त्याने कबूल केलं आहे. त्यामुळे अनिलने अशा प्रकारे कोणाची लूट केली असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा- विवाहित महिलेची आत्महत्या, सुसाईड नोट लिहीत पोलिसावर गंभीर आरोप

खरंतर मुंबई स्वच्छ रहावी म्हणून फक्त मुंबई महानगरपालिकाच नाहीतर अनेक महानगरपालिकांनी क्लीनअप मार्शल ही संकल्पना राबवली आहे. पण क्लीनअप मार्शल आपले काम सोडून खंडणी उकळत असल्याचेच प्रकार अनेकदा समोर आले आहेत. डोंबिवलीत तर एका क्लीनअप मार्शलने एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता, तर मुंबईत क्लीनअप मार्शलने नागरिकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढंच नाही तर क्लीनअप मार्शल यांनी खोट्या दंडाच्या पावत्या छापून नागरीकांकडून दंड वसूल करुन मोठा अपहार केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे क्लीनअप मार्शल हे मुंबई स्वच्छ करण्याकरता आहेत की नागरीकांकडून खंडणी उकळण्यासाठी आहेत हा आता चर्चेचा मुद्दा झाला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 4, 2021, 12:06 AM IST

ताज्या बातम्या