मुंबई, 29 मार्च : मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Death case) प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या भेटीदरम्यान, मनसुख हिरेन याने काय केले याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
17 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील वालचंद हिराचंद मार्गावरील हॉटेल शिवाला जवळील सिग्नलवर एक काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी येऊन थांबते, या गाडीत मनसुख या गाडीत बसतात आणि ही गाडी निघून जाते. हे आतापर्यंत तपासात समोर आलं होतं. मात्र, तपासात आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे या 17 फेब्रुवारीच्या रात्री मनसुख हिरेन ज्या काळ्या रंगाच्या मर्सडीज गाडीत बसून गेले होते ती मर्सिडीज गाडी पुढे जाऊन अगदी 50 मीटरच्या अंतरावर असलेल्या जनरल पोस्ट ऑफिस सिग्नलजवळ थांबली आणि जवळपास आठ ते दहा मिनिटांनी मनसुख हे या मर्सिडीज गाडीतून खाली उतरले आणि तो पुन्हा रोड ओलांडून पलीकडे गेले.
त्यांनतर मर्सिडीज गाडीने युटर्न घेऊन पुन्हा सिग्नलवर येऊन थांबली. मनसुख हिरेन हे पुन्हा त्या मर्सिडीज गाडीकडे गेले आणि अगदी पाच ते दहा सेकंद उभ्यानेच गाडीतील चालकाशी चर्चा केली आणि पुन्हा ते त्या गाडीत बसले. हे अशा प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.
यावरून तपास यंत्रणांचा हा पूर्ण विश्वास पटलेला आहे की, 17 फेब्रुवारी च्या मनसुख याने याच मर्सिडीज गाडीतील चालकाला हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीची चावी दिली आणि या चावीच्या सहाय्याने मन्सूर याने मुलुंड ऐरोली रोडवर पार्क केलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी चोरण्यात आली. म्हणजेच 17 फेब्रुवारीच्या रात्री मनसुख साधारणपणे सायंकाळी साडेसातच्या सुमारास ठाणे नौपाडा येथील त्यांच्या क्लासिक कार डेकोर या दुकानातून हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी घेऊन निघाला आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड ऐरोली दरम्यान गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मनसुख हिरेन साधारणपणे सायंकाळी सातच्या सुमारास हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी तेथे पार्क केली आणि पुढे ते मुंबईच्या दिशेने निघून गेले.
6,6,6,6,6,6! 'या' ऑलराऊंडरने एकाच ओव्हरमध्ये लगावले सहा सिक्स
पुढे ते क्राफड मार्केट येथे त्याचा मित्र मनोज ओसवाल याला भेटला आणि त्यानंतर ऑपेरा हाऊस इथं तो त्याच्या कामानिमित्त निघून गेला पण ज्या दुकानात त्याला जायचे होते ते दुकान बंद असल्याने तो परत माघारी फिरले. येताना त्याने त्याचा मित्र मनोज जयस्वाल याला मज्जिद बंदर उड्डाणपुलाजवळ बोलावले आणि दोघे एकत्र टॅक्सीत बसून ठाण्याला निघून गेले, असा जबाब मनुसख हिरेन यांनी मुंबई क्राईम ब्रँचला दिला होता.
मात्र, मनसुख चा हा जबाब सचिन वाझे यानेच घेतला असल्याने हा जबाब खोटा आणि फेरफार केलेला असल्याचे आता तपासात समोर आले आहे आणि त्याच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. म्हणजेच 17 फेब्रुवारीच्या रात्री मनसुख हे मनोज जयस्वाल नावाच्या आपल्या मित्राला भेटलेच नाही. तसंच ते ऑपेरा हाऊस येथे गेलेच नव्हते. तर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील हॉटेल शिवाला येथे जाऊन थांबले आणि थोड्याच वेळात म्हणजेच रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी वालचंद हिराचंद मार्गावरील सिग्नलजवळ आलेल्या मर्सिडीज गाडीत मनसुख बसले आणि त्यानंतर 8 ते 10 मिनिटं या गाडीतील चालकाची चर्चा करून मनसुख जनरल पोस्ट ऑफिस येथे उतरले.
मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन!
पण नंतर पुढे काही सेकंदातच मनसुख पुन्हा या मर्सिडीज गाडीत बसले. तपास यंत्रणेला हा डाव वाटत आहे की मर्सिडीज गाडी सचिन वाझे चालवत होता आणि सचिन वाझे यालाच मनसुख यांनी याच दरम्यान हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीची चावी दिली आणि याच चावीच्या सहाय्याने नंतर हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी चोरण्यात आली.
कारण, मुंबई क्राईम ब्रांचने हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा तपास केला होता, या तपासादरम्यान समोर आलेल्या या स्कॉर्पिओ गाडीच्या फॉरेन्सिक अहवालानुसार, स्काॅर्पिओ गाडी चोरत असताना यात कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करण्यात आली नाही एवढंच नाहीतर कोणत्याही साहित्यांचा किंवा हत्यारांचा वापर करून गाडी सोडण्यात आली नाही. एक तर बनावट चावीने किंवा खऱ्या चावीने हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी उघडण्यात आली आहे, असं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं आणि तिथूनच या या सगळ्या कटाचा उलगडा होऊ लागला होता. आज शेवटी 17 फेब्रुवारीच्या रात्री जी काही घटना घडली, चावी कशी देण्यात आली, कुठे घेण्यात आली कोणी दिली आणि कोणी घेतली या सर्व प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणांना मिळाली असून हे सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.