Home /News /mumbai /

'इथं लघवी करु नकोस' सांगितल्याने चाकू भोसकून हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना

'इथं लघवी करु नकोस' सांगितल्याने चाकू भोसकून हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai man killed over minor argument: मुंबईतील वडाळा परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : मुंबईतील वडाळा (Wadala Mumbai) परिसरात शुक्रवारी एका व्यक्तीची हत्या (murder over minor dispute) झाली. या हत्येमागचं कारण समोर आलं असून ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. लघवी करण्यास आक्षेप घेतल्याने चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मुंबईतील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास टेम्पो चालक म्हणून काम करणारा मोहम्मद रफिक अन्सारी हा वडाळा पूर्व परिसरातील एका बागेजवळ बसला होता. यावेळी आरोपी अब्दुल्ला जहांगीर शेख तेथे आला आणि लघवी करण्यास सुरुवात केली. यावर मोहम्मद यांनी आक्षेप घेत त्याला थांबवले. येथे लघवी करु नकोस अन्य ठिकाणी जाऊन करं असं मोहम्मद यांनी अब्दुल्ला याला सांगितले. त्यानंतर अब्दुल्ला चांगलाच संतापला आणि त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी संतापाच्या भरात अब्दुल्ला याने मोहम्मद यांच्यावर चाकूने हल्ला केला. मोहम्मद यांच्या छातीवर आरोपीने वार करुन घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर मोहम्मद यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मोहम्मद अन्सारी यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटना घडली तेव्हा आरोपी अब्दुल्ला हा दारूच्या नशेत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. मुंबईतील महिलेवर आध्यात्मिक बाबाकडून विकृत कृत्य; गुजरातमधून अटक दुसऱ्या एका घटनेत महिलेवर अत्याचार करणाऱ्याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात एका आध्यात्मिक बाबाने एका महिलेवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं काही दिवसांपूर्वी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपीला गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत. गौतम गिरी घनश्याम गिरी गोसाई असं अटक केलेल्या 26 वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी गौतम गिरी याने काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका महिलेला विविध प्रकारचे आमिष दाखवून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं होतं. याप्रकरणी पीडितेनं गुन्हा दाखल केल्यानंतर, एका बाबाला पोलिसांनी अटक केली होती. पण आरोपी गौतम गिरी फरार होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी गौतम गिरी घनश्याम गिरी गोसाई या आध्यात्मिक बाबाला गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी 30 सप्टेंबर रोजी ही कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Mumbai

    पुढील बातम्या