धक्कादायक! मुंबईच्या रुग्णालयातील बाथरुममध्ये आढळला मृतदेह, BMCकडून गंभीर दखल

धक्कादायक! मुंबईच्या रुग्णालयातील बाथरुममध्ये आढळला मृतदेह, BMCकडून गंभीर दखल

सदर व्यक्ती 4 ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याने रुग्णालयानेच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : मुंबईच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयातील बाथरूममध्ये रुग्णाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सूर्यभान तेजबहादूर यादव (वय 27) असं या आरे कॉलनी येथे राहणाऱ्या मृत रुग्णाचं नाव आहे. कोरोनामुळे त्याला टीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 14 दिवस रुग्णालयाच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह पडूनच होता. मात्र कोणालाही याचा पत्ताही लागला नाही. 18 ऑक्टोबरला पोलिसांना कळलं की बाथरूममध्ये मृतदेह सापडला आहे.

सदर व्यक्ती 4 ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याने रुग्णालयानेच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. मृतदेह कुजल्यामुळे मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सुर्यभान यादव यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

काय आहे BMC चं म्हणणं?

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात शौचालयात अज्ञात मृतदेह आढळून आल्याच्या घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच गांभीर्याने नोंद घेतली आहे. या घटनेप्रकरणी चौकशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खात्याकडून समिती देखील 22 ऑक्टोबर 2020 रोजी गठीत करण्यात आली आहे. उपकार्यकारी आरोग्य अधिकारी (विशेष रुग्णालय) यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या या समितीने तीन ते चार दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे, असं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2020, 11:47 PM IST

ताज्या बातम्या