Home /News /mumbai /

कल्याणमध्ये 2 तरुणांची विवस्त्र करून धिंड काढली, धक्कादायक कारण समोर

कल्याणमध्ये 2 तरुणांची विवस्त्र करून धिंड काढली, धक्कादायक कारण समोर

बाजारपेठ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 5 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून आता त्यांचा शोध घेत आहे.

कल्याण, 21 फेब्रुवारी : कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये 2 तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 5 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून आता पोलिसांकडून त्यांचा शोध घेत आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरून दोन तरुणांना व्यापाऱ्यांनी आधी जमिनीवर बसवलं. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार घडत असताना आजुबाजूला बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात मारहाण झालेल्या या दोन तरुणांचे नाव मनीष गोसावी आणि सिद्धूक गुजर आहे. दोघे तरुण मार्केट मध्ये फिरत होते. काही दिवसांपासून मार्केटमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे व्यापारांना संशय आला की, मोबाईल चोरी करणारे हेचे ते दोघे तरुण आहेत आणि कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता दोघांना विवस्त्र करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर दोघांची धिंड सुद्धा काढली गेली. हा सर्व प्रकार बघून मार्केट मधील एक व्यापारी सलमान शेख हे दु:खी झाले. त्यांनी पोलिसांना पाचारण केले. समाजसेवक महेंद्र मिरजकर आणि सलमान शेख यांच्या पुढाकाराने हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. ATSने पुण्यात असा रचला सापळा, एमडी ड्रग्सची फॅक्टरी केली उद्ध्वस्त सलमान शेख यांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे तरुणांना मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. ज्या तरुणांना मारहाण झाली आहे त्या तरुणांचा काही पोलीस रेकॉर्ड आहे का? याचा तपास सुद्धा पोलीस करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या