शिवसेनेनं जिंकून दाखवलं, सलग तिसऱ्यांदा विजयी होत शिवसैनिकाने भाजपला हरवलं

शिवसेनेनं जिंकून दाखवलं, सलग तिसऱ्यांदा विजयी होत शिवसैनिकाने भाजपला हरवलं

'शिवसेनेचाच विजय होईल हा आत्मविश्वास होता. अनेकांना निवडणूक चुरशीची वाटली पण चुरस नव्हतीच, कारण इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी आणि सपाने आम्हाला मतदान केलं.'

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : मुंबई महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीतही शिवसेनेनं बाजी मारली आहे. शिवसेनेकडून यशंवत जाधव यांनी हॅटट्रिक साधत दणदणीत विजय मिळवला असून भाजपचा पराभव केला आहे. काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार मागे घेतल्यामुळे सेनेनं पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे.

मुंबई महापालिकेची स्थायी सभापती आणि शिक्षण समितीची अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. पण, ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेऊन महाविकास आघाडीचा धर्म पाळला.

‘मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षडयंत्र’, पोलीस आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून तिसऱ्यांदा यशंवत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज दुपारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत यशवंत जाधव यांना 14 मतं पडली. तर भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांना फक्त 9 मतं पडली.  या निवडणुकीत काँग्रेसचे तीन नगरसेवक  तटस्थ राहिले होते. तर यशवंत जाधव यांच्या विजयात राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही पक्षांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.

'शिवसेनेचाच विजय होईल हा आत्मविश्वास होता. अनेकांना निवडणूक चुरशीची वाटली पण चुरस नव्हतीच, कारण

इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी आणि सपाने आम्हाला मतदान केलं. राज्यात महाविकास आघाडी आहेच. त्यामुळे त्यांचा सहयोग आम्हाला मिळाला. काँग्रेसला न्यायालयानेच विरोधी पक्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे ते महापालिकेत विरोधी बाकांवरच बसतील. मात्र, ते विरोधक असले तरी त्यांच्या भावना आमच्यासोबत आहे', अशी प्रतिक्रिया यशवंत जाधव यांनी दिली.

त्याआधी सकाळी शिक्षण समितीची निवडणुकीत ऐन वेळी नाट्यमय घडामोडींना वेग आला. शिवसेनेच्या संध्या दोशी यांचा अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिक्षण समिती निवडणुकीत भाजपच्या सुरेखा पाटील यांचा संध्या दोशी यांनी पराभव केला आहे.

पुण्यात थरारक घटना, मोकळ्या मैदानात कुख्यात गुंडाला दगडाने ठेचून मारले

या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार दिला होता. पण, आज ऐनवेळी काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळत उमेदवारी अर्ज मागे घेतला.  तसंच मतदानाच्या वेळी काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली. तर, राष्ट्रवादी आणि सपाच्या नगरसेवकांनी शिवसेना उमेदवार संध्या दोशी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेनं बाजी मारली.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या