Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांची मातोश्री आणि शिवसेनाभवनावर बैठका पार पडत आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांची मातोश्री आणि शिवसेनाभवनावर बैठका पार पडत आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांची मातोश्री आणि शिवसेनाभवनावर बैठका पार पडत आहे.

    मुंबई, ०७ जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thckery) यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर येत आहे. अशातच एका शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने ( heart attack ) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. बंडखोरांविरोधात शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. मातोश्रीवर (Matoshree) येऊन शिवसैनिक पाठिंबा दर्शवत आहे. पण, या गर्दीमध्ये एका शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. भगवान काळे असं या शिवसैनिकाचं नाव आहे भगवान काळे हे शहापूर तालुक्यातील रहिवासी होते, असं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांची मातोश्री आणि शिवसेनाभवनावर बैठका पार पडत आहे. भगवान काळे हे वाशाळा येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते. मातोश्रीवर बैठक सुरू असताना अचानक काळे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काळे यांना तातडीने कलानगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, वाटेतच त्यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. भगवान काळे यांच्या निधनामुळे शिवसेनेत हळहळ व्यक्त केली जात आहे. शहापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काळे यांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. 'मातोश्री'वरून बोलावलं तर एकनाथ शिंदेंसह जाणार -सुहास कांदे दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वच बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. आमदार सुहास कांदे देखील आपल्या नांदगाव मतदारसंघात परतले. त्यानंतर कांदे हे सपत्निक साईबाबा मंदिरात दर्शनासाठी शिर्डीत आले होते. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आपण साईबाबांना नवस केला होता आणि तो फेडण्यासाठी शिर्डीत बाबांच्या दरबारी आल्याचं सुहास कांदे यांनी साई दर्शनानंतर सांगितलं. मातोश्रीवरुन फोन आला आणि तुम्हाला बोलावलं तर या प्रश्नावर उत्तर देतांना आमदार कांदे म्हणाले की, आम्हाला आजही मातोश्रीवर बोलवावे असे वाटते, परंतु बोलावलं तर एकटा जाणार नाही, सर्वजण सोबत जावू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवले तर आम्ही नक्की जावू मात्र एकटा जाणार नाही',असे वक्तव्य कांदे यांनी केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या