S M L

उद्धव ठाकरेंच्या समोरच सेनेचे शिलेदार एकमेकांना भिडले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांमध्येच खडाजंगी झाली.

Sachin Salve | Updated On: Sep 18, 2017 08:58 PM IST

उद्धव ठाकरेंच्या समोरच सेनेचे शिलेदार एकमेकांना भिडले

18 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांमध्येच खडाजंगी झाली.

उद्धव ठाकरेंच्या समोरच शिवसेना नेत्यांची हमरातुमरी झाली. मावळचे आमदार श्रीरंग बारणे आणि नीलम गोऱ्हेंमध्ये चांगलाच वाद झाला.  लक्ष्मण जगताप यांना नीलम गोऱ्हेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते. त्यावरून बारणेंनी गोऱ्हेंना टोमणा मारला. ज्यांची लायकी नाही त्यांनी माझ्या मतदारसंघात लुडबुड करू नये असा टोला बारणेंनी लगावला.  यावर गोऱ्हेंनी पलटवार केला. माझी लायकी काय आहे ते पक्षाला माहीत आहे असं सांगताना नीलमताईंना रडू कोसळलं.

तर दुसरा वाद झाला तो रायगडचे भरत गोगावले आणि रामदास कदमांमध्ये. नारायण राणे जेव्हा पक्ष सोडून गेले. तेव्हा आम्ही पक्षासोबत  खंबीरपणे उभे होतो. मंत्र्यांना आमच्याशी नीट बोलायला सांगा, आम्हाला काही मंत्री बनायचे नाहीये. ग्रामपंचयातीच्या निवडणुका आल्या आहेत. आमचे मंत्री आम्हाला किती आर्थिक पाठबळ देणार? हे त्यांनी आता सांगावं असं आव्हानच गोगावले दिलं.तर तुम्ही मंत्र्यांचं नाव घ्या, सरसकट सर्वच मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका असा टोला रामदास कदमांनी लगावला. तसंच माझ्या खात्याचे अधिकार माझ्याकडेच नाहीत. त्यामुळे माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. याआधी आम्ही निवडणूक लढलो. तुमच्यापेक्षा जास्त लढलो, तेव्हा आम्ही निवडणूक बिनपैशांनी जिंकलो आहोत, हे लक्षात ठेवावं असा टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 08:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close