Elec-widget

'गाईला वाचवा पण बाई असुरक्षित याची मला लाज वाटते'

'गाईला वाचवा पण बाई असुरक्षित याची मला लाज वाटते'

गोमातेला वाचवून माझ्या देशात माझी माता असुरक्षित आहे याची मला लाज वाटते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्ववादावर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : गोमातेला वाचवून माझ्या देशात माझी माता असुरक्षित आहे याची मला लाज वाटते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्ववादावर टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रखर मुलाखत घेतली आणि यातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या मुलाखती दरम्यान आम्ही देश आणि हिंदुत्वासाठी भाजपशी मैत्री केली पण तोच पक्ष सत्तेत आल्यानंतर देशाचं हिंदुत्व, देशाची सुरक्षा याला काही महत्त्व देत नाही.

त्याकाळी शिवसेना प्रमुखांना जे हिंदुत्व मान्य होतं ते आता तुम्हाला मान्य आहे का ? आता हिंदुत्वाच्या नावाखाली जो उच्छाद मांडून ठेवला आहे तो तुम्हाला मान्य आहे का असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला असता. हे हिंदुत्व मला मान्य नाही. असं प्रखरपणे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आम्ही 'भारतीय जनते'चे मित्र आहोत - उद्धव ठाकरे

आपल्या देशात गायीला वाचवा पण बाई असुरक्षित आहे याची मला लाज वाटते. आज माझी माता माझ्या देशातली स्त्री सुरक्षित नसताना कोणतं मांस खायचं आणि कोणतं नाही यावर जर तुम्ही भांडणार असाल तर हे थोतांड आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. त्यावर शिवरायांच्या नावे केलेली बॅनरबाजी ही शिवरायांच्या विचारांची नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...

Loading...

VIDEO : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर सपत्नीक केली विठ्ठलाची पुजा

आषाढी एकादशीला "अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर..."

...तर राहुल गांधीच पंतप्रधान होणार : काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...