S M L

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उपोषणाला बसणं कधीच मान्य नव्हतं

Updated On: Sep 5, 2018 03:44 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई, ०५ सप्टेंबर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत भाजपचे आमदार राम कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी आणि भाजप पक्षाने राम कदमवर लवकरात लवकर कारवाई करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकीकडे राम कदमांचा समाचार घेतल्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषदेचा त्यांचा दुसरा मुद्दा मांडत पटेल समाजाच्या आंदोलनाचा चेहरा हार्दिक पटेलला पाठिंबा असल्याचे सांगितले. गेल्या १२ दिवसांपासून हहार्दिक पटेल समाजाच्या आरणासाठी गुजरातमध्ये उपोषण करत आहे. मात्र त्याने उपोषण करु नये अशी इच्छा उद्धव यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 'हार्दिक हा लढवैय्या आहे. जे लढवय्यै असतात ते कधीच उपोषणाला बसत नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उपोषणाला बसणं कधीच मान्य नव्हतं. हार्दिकची गुजरातला गरज आहे. त्यामुळे त्याने उपोषण करु नये,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे-

सनातन

- संशय पिशाच्च करून भूत उभं करायचं पण पुरावा नाही मग असा का

- दहशतवादाला जात धर्म नसते तर मग हिंदू आतंकवादी हा काय प्रकार आहे?

Loading...
Loading...

- हिंदुत्ववादाची सत्ता आहे मग हिंदू दहशतवाद कसा उभा राहील?

नोटबंदी

- परिचारक, छिंदम, राम कदम यांच्यावर करवाई झाली पाहिजे

- नोटबंदी फसली मग जबाबदारी कोण घेणार

- झालेलं नुकसान तुम्ही स्वीकारणार का?

- गरज पडली तर पुन्हा नोटबंदी झाली तर जनता शांत बसणार नाही

- शिवसेना कधी सत्तेतून बाहेर कधी पडणार हा घासून गुळगुळीत झालेला प्रश्न

- आम्ही घ्यायची तेव्हा भूमिका घेणार

- सत्तेत राहून जनतेसाठी चांगल्या गोष्टी करतो आणि विरोधात जाऊनही भूमिका मांडतो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 02:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close