'लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, सीएम-पीएमच्या सुरक्षेत वाढ करा' सामनातून शिवसेनेची खोचक टीका

'लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, सीएम-पीएमच्या सुरक्षेत वाढ करा' सामनातून शिवसेनेची खोचक टीका

माओवादी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हत्येचा कट रचत होते, या बातमीवरून आता शिवसेनेनंही खोचक टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : माओवादी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हत्येचा कट रचत होते, या बातमीवरून आता शिवसेनेनंही खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना मोसादच्या धर्तीवर सुरक्षी पुरवता येईल का, आणि पंतप्रधानांची सुरक्षा वाढवणं शक्य आहे का, यावर विचार व्हावा, अशी कोपरखळी सामनाच्या अग्रलेखातून मारण्यात आली आहे.

मोदी आणि फडणवीसांच्या जीवाला धोका आहे, या कथानकात कच्चे दुवे आहेत, अशी टीकाही करण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांना आलेल्या धमक्यांच्या पत्रांवरून आता राजकारण पेटलं आणि राजकीय फडकेबाजीला सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाही.

लाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. त्यामुळे मोदी, फडणवीसांना दीर्घायुष्य लाभो असं म्हणत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करा अशी मागणीही सामनातून करण्यात आली आहे.

पाहूयात सामनामध्ये नेमकं काय लिहिलंय ते...

''पुणे पोलिसांनी भीमा कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना अटक केली. हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी, फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे.

अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय, आणि मुख्यमंत्री फडणवीसांना 'मोसाद'च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल.

कारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील (तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत. आम्ही मोदी आणि फडणवीस यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत.''

 

हेही वाचा...

मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्याची जबाबदारी या तीन मंत्र्यांवर

माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं होतात, संभाजी भिडेंचं अजब विधान

पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही ! मुख्यमंत्र्यांचा पलटवार

UPSC परीक्षा न देता बनता येणार IAS अधिकारी, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

VIDEO मालवणच्या रॉक गार्डनमध्ये सेल्फी काढत असताना आली मोठी लाट आणि...

सोलापूरकरांच्या 'या' उपक्रमामुळे झाडं झाली मुक्त !

First published: June 11, 2018, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading