'आधी मंदिर, मग सरकार', सेनेचा भाजपवर हल्लाबोल

'आधी मंदिर, मग सरकार', सेनेचा भाजपवर हल्लाबोल

आम्ही अयोध्येकडे कूच करीत आहोत ते कुंभकर्णास जागे करण्यासाठी. शिवसैनिकांसह देशातील कोट्यवधी लोक श्रीरामाचा जयजयकार करीत आहेत. ‘‘राममंदिर आज नाही तर कधीच नाही!’’ अशा घोषणा देत आहेत.

  • Share this:

24 नोव्हेंबर : राममंदिर उभारणीसाठी आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. रामाच्या नावाने जी सत्ता मिळवली, त्याची चार वर्षे सरून गेली. पण आमचा राम मात्र अयोध्येतच वनवासात आहे निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका 'आधी मंदिर, मग सरकार' अशी गर्जना करत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रेलेखामधून अयोध्ये दौऱ्याबद्दल आज पुन्हा एकदा शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आम्ही श्रीरामाच्या पवित्र भूमीस वंदन करण्यासाठी निघालो आहोत.  प्रचंड लढ्यानंतरही राममंदिर अद्याप उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे.  राममंदिर उभारणीसाठी आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. उठा, रामाच्या नावाने जी सत्ता मिळवलीत आणि उबवलीत त्याची चार वर्षे सरून गेली. तुम्ही राजवैभवात लोळत आहात, पण आमचा राम मात्र अयोध्येतच वनवासात आहे निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका. राममंदिर उभारणीसाठी जागे व्हा! प्रत्येक हिंदूची आता एकच गर्जना आहे, 'आधी मंदिर, मग सरकार' तेव्हा झोपलेल्या कुंभकर्णांनो उठा, आता उठला नाहीत तर कायमचे झोपून जाल असा हल्लाबोल सेनेनं भाजपवर केली.

आम्ही अयोध्येकडे कूच करीत आहोत ते कुंभकर्णास जागे करण्यासाठी. शिवसैनिकांसह देशातील कोट्यवधी लोक श्रीरामाचा जयजयकार करीत आहेत. ‘‘राममंदिर आज नाही तर कधीच नाही!’’ अशा घोषणा देत आहेत. झोपलेल्या कुंभकर्णा आता तरी जागा हो असा टोलाही लगावण्यात लेखातून आलाय.

निवडणुका आल्या की, राम आठवतो. मग अयोध्येत राममंदिर  का बांधत नाही? हा सरळ प्रश्न आहे. आम्हाला राममंदिराचे राजकारण करायचे नाही. ‘‘राम की रोटी?’’ असा प्रश्न विचारला जातो. रोटी महत्त्वाची आहेच, पण रामाच्या नावाने सत्ता मिळवली ती ‘रोटी’ देण्यासाठी असा टोलाही सेनेनं लगावलाय.

प्रत्येक निवडणुकीत राममंदिराचे वचन दिले गेले; पण राममंदिरवाल्यांची सत्ता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात येऊनही राममंदिर काही निर्माण झाले नाही आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या अयोध्येतच वनवासी बनले. हाच सगळ्यात मोठा विश्वासघात आहे. रामभक्त म्हणून जे सत्तेवर आले त्यांचा कुंभकर्ण झाला अशी टीकाही पंतप्रधान मोदी याचे नाव न घेता करण्यात आली.

राममंदिराची उभारणी न्यायालय नाही, तर आजचे सरकार करील. कारण रामाच्या नावावर तुम्ही मते मागितली. त्यामुळे 2019 पूर्वी एक अध्यादेश काढा आणि सरळ राममंदिर उभारणीस सुरुवात करा. तुमच्या राज्यात वाल्याचे वाल्मीकी होतात, पण राममंदिर होत नाही अशी टीकाही करण्यात आली.

=======================

First published: November 24, 2018, 8:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading