कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकलेला नाही, त्यांनी गैरहजर राहण्याची अनुमती मागितली होती, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

  • Share this:

07 जून : राज्यातील शेतकरी संपावरुन सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे. शिवसेना शेतकऱ्यांसोबत असून कर्जमाफीची घोषणा ही अर्धवट आहे. यामुळे शिवसेनेच्या परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.

भाजप सरकारने कर्जमाफीचा निर्णय हा शिवसेनेला विचारात न घेता घेतला  आहे, असं सुभाष देसाई यांनी सांगितलं. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आधी भूमिका स्पष्ट करावी, असं ही देसाईंनी म्हटलं आहे. तसंच, उद्धव ठाकरेंना माहिती दिल्याशिवाय सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला नाही. त्यांनी रितसर मुख्यमंत्र्यांकडे गैरहजर राहण्याची अनुमती मागितली आहे. आजच्या बैठकीत महत्वाचे विषय नसल्याने, मुख्यमंत्र्यांनीही त्यांना गैरहजर राहण्याची अनुमती दिली असल्याचं सुधीर मुनगंटीवार शिवसेना-भाजपमध्ये वाद नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

First published: June 7, 2017, 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading