Home /News /mumbai /

'मंदिरं खुली व्हावीत असं मुख्यमंत्र्यांनाही वाटतं पण...', संजय राऊत यांची भाजपवर टीका

'मंदिरं खुली व्हावीत असं मुख्यमंत्र्यांनाही वाटतं पण...', संजय राऊत यांची भाजपवर टीका

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई, 03 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे विरोधक मंदिर सुरू करण्याबाबत जोर धरत आहेत. अशात लॉकडाऊनची भूमिका ही केंद्र सरकारची आहे. त्यात राज्य सरकारने मंदिरांसंदर्भात घेतलेली भूमिका लोकांच्या आरोग्यासंदर्भात घेतलेली आहे. मंदिरं खुली व्हावीत असं मुख्यमंत्र्यांनाही वाटतं. पण पूर्ण तयारी होऊन हा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. करोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळे विचार करून पाऊलं उचलावी लागतील असं संजय राऊत म्हणाले आहेत. विरोधासाठी विरोध नको. संभाजीनगरचे खासदार रस्त्यावर उतरल्यावर तिथे सगळा फज्जा उडालेला दिसतो आहे. इतकंच नाही तर सरकारने बदलल्यांवर बदल्या करू नये असं कुठे कायद्याच्या पुस्तकात लिहिलं का? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - तुमच्या लोकांनाच ठेवून काम करावं अशी अपेक्षा आहे का ? - केंद्रात मोदींचे सरकार आल्यावर बदल्या झाल्या नाहीयंत का ? - बदल्या राज्याच्या हितासाठी आहेत कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! - संपूर्ण मंत्रीमंडळ फिरतो - सीएम आणि पीएम यांची कामाची पद्धत सारखीच आहे - सीएम गेले की गर्दी होते - पीएम हा प्रोटोकाॅल तोडत नाहीत - सीएमनी काम कुठून काम करतायंत त्यापेक्षा काम करतायंत हे महत्त्वाचं आहे - फडणवीस ते फिरतायत त्यांचा फिडबॅक घेणार 'महाराष्ट्रातच देऊळ बंद का?' राज ठाकरेंनी पत्र लिहून उद्धव ठाकरेंना विचारला सवाल - आरेच्या विषयावर संबंधित मंत्री बोलतील - जीडीपीच्या विषयावर राज्यातील विरोधकांनी बोललं पाहिजे - चीनच्या बातम्या आपल्याकडे गाळून येतायंत हा तर निव्वळ हलगर्जीपणा! कोरोनाच्या मृत रुग्णांवेळी वापरलेले PPE कीट उघड्यावरच.. - संसदेत प्रश्नोत्तरं होत नाहीत. ते कोरोना परिस्थितीमुळे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. अधिवेशन होतं आहे हे महत्त्वाचे, आम्ही योग्य ठिकाणी प्रश्न विचारत राहू - कंगना रणौत - कोणाला महत्त्व किती द्यायचंय ते पाहावं लागेल - रायकर यांच्यावर उपचाराची शर्थ करण्यात आली. सगळ्याला राज्य सरकारला लगेच जबाबदार ठरवू नये
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या