Home /News /mumbai /

सरकारमधून बाहेर पडू, इशारा देणाऱ्या काँग्रेस मंत्र्याला संजय राऊतांनी दिले उत्तर, म्हणाले...

सरकारमधून बाहेर पडू, इशारा देणाऱ्या काँग्रेस मंत्र्याला संजय राऊतांनी दिले उत्तर, म्हणाले...

'केंद्रात काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे. मात्र, त्यांची ताकद कमी झाली आहे हे सत्य आहे.'

    मुंबई, 25 ऑगस्ट : अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये मोठा वादंग पाहण्यास मिळाला होता. काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशाराच दिला होता. त्यांच्या विधानावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी सरकार स्थिर असल्याचे पुन्हा एकदा बोलून दाखवले आहे.  'काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत आमचा त्यांच्याशी संवाद चांगला आहे.  राज्यातील सरकारमधून बाहेर पडावा अशी इच्छा राहुल गांधी यांची नाही, आमचा त्यांच्याशी योग्य संवाद सुरू आहे' असं राऊत यांनी सांगितले. मोठी बातमी, काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवारांच्या भेटीला तसंच, 'महाराष्ट्रामध्ये सरकार कसं सुरू आहे, हे दिल्लीतील नेत्यांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे हे सरकार पडेल असं वाटत नाही' असं राऊत यांनी स्पष्ट केले. 'अध्यक्षपद हे कुणाला द्यावे हा कॉंग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. केंद्रात काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे. मात्र, त्यांची ताकद कमी झाली आहे हे सत्य आहे. काँग्रेस पक्षाने अंतर्गत मतभेद संपून मजबूत होणे अपेक्षित आहे. काँग्रेसला उभारी येणार गरजेचे आहे' असंही राऊत म्हणाले. 'गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड आहे. गांधी घराण्यापलीकडे कोणी नेतृत्व करावं हे संयुक्तिक नाही. काँग्रेसचे नेतृत्व करण्याइतकी क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये आहे' असेही राऊत यांनी सांगितले. राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेच्या मंत्र्याने घेतली फडणवीसांची भेट काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. 'महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्याशी चर्चा केली. निधी वाटपामध्ये समानता हवी अशी भूमिका त्यांनी मांडली.आमदारांच्या निधीवरून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी ही चर्चा केली  आहे. आमदार नाराज असू नयेत यामध्ये मुख्यमंत्री लक्ष घालतील. पण, महाविकास आघाडीत तीन पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे निधी वाटपाचा तोडगा काढला जाईल. आमदारांमध्ये नाराजी नसून कामासंदर्भात काही मागण्या आहेत.  कोविड संकटामुळे कदाचित दुर्लक्ष झाला असेल तर महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसून हा विषय सोडवतील' अशी माहिती राऊत यांनी दिली. 12 वर्षांची मृत मुलगी अंगाला पाणी लागताच उठून बसली, नेमकं काय घडलं? तसंच, 'या वर्षाअखेरील बिहार विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुका लढायच्या की नाही, यासंदर्भात चर्चा सुरू आहे त्यानंतर निर्णय घेऊ' असंही राऊत यांनी सांगितले. काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार? 'मुळात राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाला होता. जर राहुल गांधी हे जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसते तर सरकार स्थापन झाले नसते. त्यांच्या सहमतीनेच सरकार स्थापन झाले आहे. उद्या जर राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे सांगितले तर आम्हाला एक मिनिटही लागणार नाही', असंही वडेट्टीवार म्हणाले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या