Home /News /mumbai /

त्याचा राग रानगव्यास मारून काढला काय? सेनेनं चंद्रकांत पाटलांना डिवचले

त्याचा राग रानगव्यास मारून काढला काय? सेनेनं चंद्रकांत पाटलांना डिवचले

'चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे'

    मुंबई, 11 डिसेंबर :  'एका गव्यास पुणेकरांनी (Pune) मारून दाखवले. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय?' असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपला (BJP) सणसणीत टोला लगावला. दोन दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये अवतरलेल्या गव्याचा सात तासांच्या संघर्षानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. या मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपला डिवचण्यात आले आहे. 'पुणे व आसपासच्या परिसरात अधूनमधून हिंसक, अमानुष घटना घडत असतात. मनुष्य आहे तेथे रावण आहेच, पण रावणातही किमान माणुसकी होती. अशोकवनात सूक्ष्म रूपाने घुसलेल्या हनुमानाच्या शेपटीला त्याने फक्त आग लावली, निर्घृणपणे ठार केले नाही, पण आपले पुणेकर दोन पावले पुढेच आहेत. शौर्य दाखविण्याच्या धुंदीत ते इतके निर्घृण झाले की, चुकून शहरात शिरलेल्या एका रानगव्यास हाल हाल करून मारले आहे.' असं म्हणत सेनेनं घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. 'पुण्यात शिरलेल्या गव्यावर आधी कुत्र्यांनी हल्ला केला व मग लोकांनी मारले. वाघ हा गव्याची शिकार करू शकतो. कळपात असेल तर गवाही वाघाला शिंगावर घेऊन आपटतो, पण पुण्यातील लोक हे वाघापेक्षा शूर झालेले दिसतात. त्यांनी एकट्यादुकट्या गव्यास ठार केले आहे. पर्यावरण, वन्य प्राण्यांच्या रक्षणाबाबत सरकार जागरूक आहे. आरे जंगल, जंगलातील प्राणी वगैरे वाचविण्यासाठी सरकारने मेट्रो कारशेडची जागाच बदलली, वाघ बचाव आंदोलनात सरकार झोकून देते, मग रानगव्यास जगण्याचा अधिकार नाही काय? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला. 'चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे असं म्हणत सेनेनं भाजप नेत्यांना डिवचले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या