Home /News /mumbai /

महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता? सेनेचा भाजपला सवाल

महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता? सेनेचा भाजपला सवाल

'भाजपला मुंबईवरचा भगवा उतरवायचा आहे व ते त्यांचे अंतिम स्वप्न आहे. पण त्यासाठी संपूर्ण मुंबईची कोरोना दफनभूमी करायची. कफनाचे मांजरपाट कापड विजयी पताका म्हणून फडकवायची हे लक्षण माथेफिरू विकृतांचे आहे'

    मुंबई, 23 नोव्हेंबर : 'मुंबईवर (Mumbai) शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात ‘भाजप’ कोरोनाचा (Corona) प्रसार वाढवत आहे. पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई (BJP) रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘कोरोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत' असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) पुन्हा एकदा भाजपला फटकारून काढलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या ( saamana editorial) अग्रलेखातून वीज बिलाच्या मुद्यावरून आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेनं फटकारून काढलं आहे. Winter Tips : गरम पाण्याने आंघोळ करताय? थंडीत तुम्ही या 10 चूका कधीही करू नका पंतप्रधान मोदी यांनी ‘जी – 20’ संमेलनात कळवळून सांगितले, दुसऱ्या विश्वयुद्धानंतर कोरोना हेच सगळ्यात मोठे संकट आहे. मानवतेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे वळण आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, पण हे झाले जगासाठी. आपल्या देशाचे काय? तेथे दिव्याखाली अंधार आहे व कोरोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदी यांच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता? असा सवाल सेनेनं भाजपला विचारला आहे. 'भाजपतर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा करून स्वतःचा कंडू शमवून घेतला हे खरे. तोंडास मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, वाहतुकीसंदर्भात नियमांचे पालन नाही. कोरोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे. आपल्या या राजकीय गोंधळातून मुंबई-महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढते आहे याचे भान तरी त्यांनी ठेवावे. एका बाजूला बोंबलायचे, सरकार कोरोनाशी लढण्यात अपुरे पडत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे म्हणून टीका करायची. त्याच वेळी असे नियमबाह्य राजकीय गोंधळ घालून कोरोनाचा प्रसार वाढवायचा. कोरोनाची दुसरी ‘लाट’ येत आहे, पण भाजपला वाटत आहे ही लाट त्यांच्या राजकीय विचारांची आहे. त्याच लाटेवर शिडी लावून मुंबई पालिकेवरील भगवा उतरवू. आम्ही म्हणतो ठीक आहे. तुमचे राजकारण तुमच्यापाशी, पणत्यासाठी लोकांना कोरोनाच्या खाईत का ढकलता? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला आहे. राशीभविष्य: मेष आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी बळगायला हवा संयम 'कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असेल तर ती धोक्याची घंटा सगळ्यांसाठीच आहे. दिल्लीची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाताना दिसत आहे. देशाची राजधानी हे फक्त अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’चे राज्य नाही. ती देशाची राजधानी आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारला कोरोना नियंत्रणासाठी सर्वतोपरी मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच आहे. भाजपचे अनेक खासदार व केंद्रीय मंत्री कोविडने आजारी पडले. एक केंद्रीय मंत्री सुरेश आंगडिया तर कोरोनाचे बळी ठरले. रामविलास पासवानही गेले. अनेक खासदार कोरोनाग्रस्त झाले. याची जबाबदारी कोणी घ्यायची? असा थेट सवाल सेनेनं मोदी सरकारला विचारला आहे. 'शाळा, मंदिरे, लोकल उघडा असे सांगणाऱ्यांसाठी हा धडा आहे. राज्यातील अनेक शिक्षक व विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले आहेत. मंदिरांबाबत नियम पाळले नाही तर देवही परिस्थिती नियंत्रणात आणू शकणार नाही. त्यात विरोधी पक्ष ज्या बेजबाबदारपणे वागत आहे. त्यामुळे स्मशानात लाकडांचा साठा जास्तच करावा लागेल व भाजपची तीच अघोरी इच्छा दिसत आहे. उठसूट बोंबा मारत रस्त्यावर उतरायचे. लोकांची गर्दी गोळा करून त्यांना कोरोनाच्या गुहेत ढकलायचे हे काय माणुसकी असलेल्या पक्षाचे लक्षण आहे? भाजपला मुंबईवरचा भगवा उतरवायचा आहे व ते त्यांचे अंतिम स्वप्न आहे. पण त्यासाठी संपूर्ण मुंबईची कोरोना दफनभूमी करायची. कफनाचे मांजरपाट कापड विजयी पताका म्हणून फडकवायची हे लक्षण माथेफिरू विकृतांचे आहे', अशी टीकाही सेनेनं भाजपवर केली. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर भाजप नेते आक्रमक, केली जोरदार टीका महाराष्ट्रातील काही चवली-पावलीचे उपरे भाजप नेते प्रश्न विचारतात की, ‘‘हात धुवा, असे सांगण्याशिवाय महाराष्ट्र सरकारने काय केले?’’ त्यांना उत्तर असे की, वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले. आता जनता हात धूत आहे. मास्क लावत आहे. तुम्हाला तुमचे काही धुता येत नसेल तर लोकांची शिस्त का बिघडवता? असा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Corona, Samana, Shivsena, भाजप, शिवसेना

    पुढील बातम्या