‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, सेनेनं भाजपला फटकारले

‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, सेनेनं भाजपला फटकारले

'मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे.'

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : ‘कोरोना’चा (Corona) धुमाकूळ पुन्हा सुरू झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नव्हे, ती आता जाताना दिसत आहे. ‘एम्स’सारख्या (Aims Hosital) सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी धोक्याची जाणीव करून दिली. ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा (MVA Goverment) घटक पक्ष नाही, हे महाराष्ट्रातील विरोधकांनी समजून घेतले पाहिजे. पुन्हा लॉकडाउन (Lockdown) टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे. विरोधकांनो, निदान कोरोना संकटाबाबत तरी जरा जपून वागा, बोला' असा सल्लावजा टोला शिवसेनेनं (Shivsena) भाजपला (BJP) लगावला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट धडक मारते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे.  राज्यात ‘लॉकडाउन’ लावायचे की नाही, याचा निर्णय पुढील आठवड्यात घेऊ. ‘‘मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाउन टाळा’’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अशा प्रसंगी राजकारण न करता सरकार तसेच विरोधकांनी जनतेचे हित सांभाळावे, एकोप्याने काम करावे असे संकेत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी ‘लॉक डाऊन’बाबत इशारा देताच विरोधी पक्षनेते दरेकर यांनी वेगळेच टोकाचे विधान केले, ‘‘राज्यात लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नका. जुलमी राजवटीसारखी कृती करू नका.’’ दरेकर यांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार वगैरे तज्ञ मंडळींना तरी समजला काय? असा सणसणीत टोला सेनेनं लगावला आहे.

काय सांगता: कोहलीच्या घरी नाही एकही नोकर! विराट की अनुष्का कोण करतं सगळी घरकामं?

'कोरोना संसर्गाबाबत सत्यस्थिती समोर मांडणे याला काय दहशत पसरवणे म्हणायचे? महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याची माहिती ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ मिळवणे आणखी कठीण असल्याची भीती डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केली. यापूर्वी कोरोनाच्या अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका असल्याचे डॉ. गुलेरिया सांगत आहेत. कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेनविरोधात पुचकामी आहे हे जे डॉ. गुलेरिया तळमळीने सांगत आहेत, तो काय दहशत माजविण्याचा प्रकार आहे? ‘एम्स’चे संचालक देशाला गुमराह करीत आहेत, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीत जाऊन ‘एम्स’च्या दारात जोरदार आंदोलन केले पाहिजे. देशाचे आरोग्यमंत्रीच काय, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे उंबरठे झिजवून निषेधाची पत्रे दिली पाहिजेत' असा सणसणीत टोला सेनेनं भाजपला लगावला आहे.

'मुख्यमंत्री बोलत आहेत, लोकांना धोका समजावून सांगत आहेत म्हणून टीका करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह करणे किंवा त्यांना कोरोनाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचे स्वागत विरोधकांनी का करू नये? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.

नव्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काय होणार बदल; WhatsApp ने दिली माहिती

'महाराष्ट्रासारख्या राज्याला या कमी केंद्राकडून एखादे विशेष आर्थिक पॅकेज मिळायला हवे. असे आर्थिक पॅकेज मिळावे म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनीही मोदी यांच्याकडे तगादा लावला तरी आमची हरकत नाही. राज्यातील विरोधी पक्ष हा काही पाकिस्तानी किंवा अफगाणी वंशाचा नाही. तो याच मातीतला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस, दरेकर, आशिष शेलार वगैरे मंडळींनी दिल्लीतच ठाण मांडून बसावे व राज्याच्या वतीने एक-दोन हजार कोटींच्या पॅकेजसाठी लढत राहावे. राज्यातून देशाला जो मोठा महसूल मिळतो, त्यातला पुरेसा परतावा महाराष्ट्राला मिळाला तर विरोधी पक्षाला सरकारकडून जे करून घ्यायचे आहे, त्याचा मार्ग मोकळा होईल' असा सल्लाही सेनेनं भाजपला दिला.

Published by: sachin Salve
First published: February 23, 2021, 9:40 AM IST

ताज्या बातम्या