मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील, शिवसेनेनं बजावले

...हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील, शिवसेनेनं बजावले

'राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे.'

'राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे.'

'राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे.'

    मुंबई, 05 ऑगस्ट :'पंतप्रधान मोदी आज राम मंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील' असं म्हणत शिवसेनेनं भाजपला सल्ला दिला आहे. तसंच 'राम मंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे' अशी टोलाही सेनेनं भाजपला लगावला आहे. आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शिवसेनेनंही राम मंदिराच्या आठवणींना उजाळा देत 'हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे!' अशा शिर्षकाखाी दैनिक सामनामध्ये  सूचक जाहिरात केली आहे. तर दुसरीकडे अग्रलेखातूनही शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला टोला लगावला आहे. ‘‘बाबरी पडली, ती पाडणाऱ्य़ा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे!’’ या एकाच गर्जनेने बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट म्हणून कोट्यवधी हिंदूंच्या दिलाचे राजे बनले. आज ते स्थान अढळ आहे. त्या सगळ्यांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे. पंतप्रधान मोदी आज राम मंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील. बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल!' असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. 'हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे' राम मंदिराबद्दल शिवसेनेची सूचक जाहिरात 'न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुंत्यातून बाहेर काढले व स्पष्ट निकाल राममंदिराच्या बाजूने दिला. ते न्या. रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते, पण रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही. राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे. अर्थात जिथे श्रीराम हे कौटुंबिक राजकारण व अंतर्विरोधाचे बळी ठरले, तिथे इतर पामरांचे काय? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला. तसंच 'राममंदिराच्या राजकारणाबाबत वेगळी भूमिका असूनही काँगेस, समाजवादी पार्टी, डाव्या पक्षांतील अनेक जण मंदिर व्हावे या श्रद्धेचे होते. त्या सगळय़ांच्या भावनांची कदर होणे गरजेचे आहे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राममंदिराचे श्रेय पी. व्ही. नरसिंह राव व राजीव गांधी यांना दिलेच आहे. पंतप्रधान मोदी यांना ते राममंदिराचे श्रेय द्यायला तयार नाहीत, पण मोदी यांच्या काळातच न्यायालयाच्या गुंत्यातून राममंदिर सुटले व आजचा सुवर्णक्षण उगवला हे मान्य करावेच लागेल. तसे नसते तर राममंदिराच्या बाजूने निर्णय देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर लगेच राज्यसभेचे सदस्य झाले नसते.' असं म्हणत सेनेनं मोदींचं कौतुकही केलं आणि टोलाही लगावला. राम जन्मभूमी आंदोलनाचे हे आहेत 10 शिल्पकार, त्यांनीच घडवला इतिहास! 'राममंदिराच्या लढय़ाने देशाला हिंदुत्वाचा खरा सूर सापडला व त्याच सुराचा धागा पकडत भाजप आणि शिवसेनेने राजकीय शिखर पार केले हे मान्य केले पाहिजे. लालकृष्ण आडवाणी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाची ही ज्वाला पेटत ठेवली. देशातील बहुसंख्य हिंदूंच्या छातीवर पाय देऊन कुणाला राजकारण करता येणार नाही. निधर्मीपणाचे लक्षण म्हणजे फक्त एकाच धर्माचे लांगूलचालन नाही. हिंदू समाजाला त्यांच्या श्रद्धांशी तडजोड करता येणार नाही व त्यांच्या भावना लाथाडून पुढे जाता येणार नाही. ‘‘बाबरी पडली, ती पाडणाऱ्य़ा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे!’’ या एकाच गर्जनेने बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट म्हणून कोटय़वधी हिंदूंच्या दिलाचे राजे बनले. आज ते स्थान अढळ आहे. त्या सगळय़ांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर अयोध्येत उभे राहात आहे. पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील.' असा सल्लाही सेनेनं दिला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या