S M L
Football World Cup 2018

शेतकऱ्यांची 'थप्पड की गुंज’ सरकारच्या लक्ष्यात राहील, सेनेचा 'सामना'तून भाजपला टोला

मागण्यांचे पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळा. अन्यथा शेवटची संधी ‘शेवटची काडी’ ठरेल असा इशाराही सेनेनं दिलाय.

Sachin Salve | Updated On: Mar 13, 2018 07:55 AM IST

शेतकऱ्यांची 'थप्पड की गुंज’ सरकारच्या लक्ष्यात राहील, सेनेचा 'सामना'तून भाजपला टोला

13 मार्च : मुंबईवर धडकलेल्या शेतकरी वादळाचा तडाखा असा जबरदस्त होता. त्यामुळे सरकारला लेखी आश्वासन द्यायला भाग पाडले. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली 'थप्पड की गुंज’ सत्ताधाऱ्यांच्या कायम स्मरणात राहील असा टोला शिवसेनेनं आपल्या मुखपत्र सामनातून भाजप सरकारला लगावलाय.

नाशिकहुन 180 किमीचं अंतर पार करून शेतकरी-आदिवासींचा विराट मोर्चा मुंबईत धडकला आणि लेखी आश्वासन घेऊनच माघारी परतला. अभूतपूर्व अशा या शेतकरी मोर्चावरून शिवसेनेनं फडणवीस सरकारवर निशाणा साधला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सेनेनं भाजपला खडेबोल सुनावलेत.

"शेतकऱ्यांच्या आणखी एका तडाख्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणले आहे. या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून जाईल अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाली. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायही सरकारसमोर राहिला नाही. कालपर्यंत जे सरकार शेतकऱ्यांच्या मोर्चाबद्दल ढिम्म होते ते सोमवारी एकदम ‘संवेदनशील’ झाले. मोर्चेकरी शेतकऱ्यांचा आक्रोश ज्यांच्या कानावरही पडत नव्हता ते त्यांच्या मागण्यांबाबत ‘सकारात्मक’ झाले असं नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना टोला लगावण्यात आला.

तसंचसंपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न सरकारच्या ‘ऑनलाइन’ आणि ‘पारदर्शक’ गोंधळामुळे आजही पेटलेलाच आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याच्या शिवसेनेच्या मागणीचेच ‘ऐतिहासिक’ रूप गेल्या वर्षी शेतकरी संपात दिसले होते. या मागणीसाठी शिवसेनेने जे रान पेटवले

त्या आगीची झळ बसल्यानेच सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत घातलेल्या ‘अटी व शर्तीं’मुळे ही कर्जमाफी म्हणजे एक फार्सच ठरला होता असा दावाही या लेखात सेनेनं केला.

‘रयतेचा राजा’ छत्रपती शिवरायाचे नाव घेत सत्तेत आलेल्यांनी गेल्या तीन-साडेतीन वर्षांत फक्त घोषणाबाजीच केली आणि ‘रयते’लाच न्याय्य मागण्यांसाठी शेकडो किलोमीटर पायपीट करायला लावली. त्या बळीराजाने राज्यकर्त्यांना दिलेली ही शेवटची संधी आहे. मागण्यांचे पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळा. अन्यथा शेवटची संधी ‘शेवटची काडी’ ठरेल असा इशाराही सेनेनं दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 07:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close