Home /News /mumbai /

'शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो!'

'शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो!'

मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या.

    मुंबई, 05 मे : कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. कोरोनाशी लढा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. देशाच्या तिन्ही दलांकडून या कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी पृष्पवृष्टी करण्यात आली. मोदी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार  टीका केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला. 'रक्त आणि फुले' या शिषर्काखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात कोरोना योध्यांवर उधळण्यात आलेल्या पृष्पवृष्टीच्या सोहळ्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आली. 'काझी यांचे बलिदान विसरू नये' 'सारा देश कोरोनाशी युद्ध लढत आहे व हे युद्ध आणखी किती काळ चालेल ते सांगता येत नाही. या गडबडीत प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय चालले आहे? त्याकडे आपला कानाडोळा झाला आहे. कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवानांचे बलिदान झाले असून हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस हे कोरोना योद्धे आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी भावनिक आवाहन केले आहे. या कोरोना योद्ध्यांवर फुले बरसण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सैन्याच्या तिन्ही दलांना मैदानात आणि आकाशात उतरवले. पायदळ व नौदलानेही या मानवंदना सोहोळ्यात भाग घेतला. हासुद्धा एक वेगळाच सोहळा घडवून आणला. हेही वाचा -लॉकडाऊनमुळे राज्यासमोर आर्थिक संकट, ठाकरे सरकार बंद करणार 'ही' कामं   पंतप्रधान मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्मा झालेल्या या शूर जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांचे कर्तव्य बजावले आहे. पाचही वीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केले आहे व त्यातील एका वीराचे नाव सबइन्स्पेक्टर एस. ए. काझी असे आहे. सध्या देशात जे हिंदू-मुसलमान असा राजकीय खेळ करीत आहेत त्यांनी कर्नल शर्मा यांच्या खांद्यास खांदा लावून पाकड्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या काझी यांचे बलिदान विसरू नये', असा टोला भाजपला लगावण्यात आला. 'सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या' ‘लॉक डाऊन’ काळात कश्मिरात घुसखोरांनी हल्ले केलेच. शनिवारी रात्री अशाच एका हल्ल्यात कर्नल शर्मा यांचे जे बलिदान झाले हे त्याचेच प्रमाण आहे. कर्नल शर्मा यांचे बलिदान हे साधे नाही. शर्मा हे 21 राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांच्याबरोबर पाच बटालियनचे मेजर अनुज सूद, नायक राजेश व लान्स नायक दिनेशही मारले गेले आहेत. हिंदुस्थानी सैन्याने 5 वर्षानंतर दुसर्‍यांदा दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत कमांडिंग ऑफिसर गमावला आहे. कर्नल शर्मा यांचा त्यांची मुलगी तमन्ना हिच्याबरोबर एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. तो भावूक करणारा आहे. तमन्नाचा वाढदिवस 1 मे रोजी होता व 3 मे रोजी तिचे प्रिय वडील देशाचे रक्षण करताना वीरगतीस प्राप्त झाले. या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो! त्यांना मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या. एकाच वेळी आमचे पाच शूर जवान मारले जातात हे चांगले लक्षण नाही. आमच्याच भूमीवर आमचे जवान वारंवार मारले जातात. दिल्लीत एक मजबूत आणि प्रखर राष्ट्रवादी देशभक्त वगैरे सरकार असताना हे घडत आहे, असंही या लेखात म्हटलं आहे. हेही वाचा - लॉकडाऊनमुळे राज्यासमोर आर्थिक संकट, ठाकरे सरकार बंद करणार 'ही' कामं 'कोरोनाशी युद्ध व त्यातील योद्ध्यांना मानवंदना सुरूच राहील, पण कश्मीरमध्ये दुर्लक्ष होऊन चालणार नाही. 370 कलम काढले, कश्मीरचे तुकडे केले याबद्दल वाहवा झाली. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांचे मजबूत इरादे पक्के होते म्हणून ते झाले हे मान्य करावेच लागेल, पण आपल्या जवानांचे बलिदान थांबलेले नाही व सैन्याचे सामुदायिक शिरकाण सुरूच राहिले. कश्मीरमध्ये शहीद होणार्‍या जवानांना श्रद्धांजल्या वाहून आणि उसासे सोडून काय होणार? हंदवाडाच्या लष्करी तळावर कर्नल शर्मा यांच्यासह पाच वीर जवानांचे मृतदेह तिरंग्यात गुंडाळून ठेवले. हे छायाचित्र प्रत्येक देशवासीयाला वेदना देणारे आहे. ‘जय हिंद’चा नारा घशातच गुदमरून टाकणारे हे दृष्य आहे. कोरोना योद्धय़ांवर हिंदुस्थानी लष्कर आकाशातून फुलांची उधळण करीत असताना कश्मीरची जमीन कर्नल शर्मा यांच्यासह पाच वीर जवानांच्या रक्ताने भिजली आहे. हे चित्र चांगले नाही', अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Narendra modi

    पुढील बातम्या