मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'भाजप हा नक्की किती तोंडी नाग? विखेंचा वक्तव्यावरून सेनेचा तिखट सवाल

'भाजप हा नक्की किती तोंडी नाग? विखेंचा वक्तव्यावरून सेनेचा तिखट सवाल

विखे पाटलांचे मत हे महाराष्ट्राचे तर सोडाच, पण त्यांच्या नगर जिल्ह्याचेही मत नाही. त्यामुळे त्यांच्या बुळचट भूमिकांकडे लक्ष द्यायचे कारण नाही.

विखे पाटलांचे मत हे महाराष्ट्राचे तर सोडाच, पण त्यांच्या नगर जिल्ह्याचेही मत नाही. त्यामुळे त्यांच्या बुळचट भूमिकांकडे लक्ष द्यायचे कारण नाही.

विखे पाटलांचे मत हे महाराष्ट्राचे तर सोडाच, पण त्यांच्या नगर जिल्ह्याचेही मत नाही. त्यामुळे त्यांच्या बुळचट भूमिकांकडे लक्ष द्यायचे कारण नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 03 डिसेंबर : 'विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठ्यांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?’ हा निर्लजपणाच आहे, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानामुळे एकीकडे उदयनराजे आक्रमक होत रायगडावर आक्रोश करणार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राज्यपाल आणि भाजप नेत्यावर टीका करण्यात आली आहे.

'भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर आता नव्याने संशोधन करायला हवे. एखाद्या विषयावर हवे तेव्हा वळवळायचे किंवा फूत्कार सोडायचे व नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजप नेमके हेच करीत आहे. आता महसूलमंत्री विखे पाटील यांनी राज्यपालांचा बचाव केला आहे. कोश्यारींविरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपतींच्या संदर्भात अपमानास्पद विधाने करावीत हे विखे पाटील वगैरे लोक सहन करतील; कारण सध्या ते ज्या पक्षाच्या पखाली वाहत आहेत त्या पक्षाचे ते धोरण आहे. पण विखे पाटलांचे मत हे महाराष्ट्राचे तर सोडाच, पण त्यांच्या नगर जिल्ह्याचेही मत नाही. त्यामुळे त्यांच्या बुळचट भूमिकांकडे लक्ष द्यायचे कारण नाही. सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खवळून सांगितले, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर राहतात हा निर्लज्जपणा आहे.’ यावर विखे पाटील वगैरे लोकांचे काय म्हणणे आहे? असा सवाल करत सेनेनं भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

(शिंदे-फडणवीस सरकारला कोर्टाचा दणका; राज्य सरकारच्या त्या महत्त्वाच्या निर्णयाला स्थगिती)

'गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांची तुलना शंभर तोंडांच्या रावणाशी करताच मोदी व त्यांच्या लोकांनी लगेच काँग्रेस व खरगेंवर प्रतिहल्ले सुरू केले. मोदींना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे. गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असे मोदी सांगू लागले. पंतप्रधानांचा अपमान करणे हे चूकच आहे. मात्र जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही असे भाजपचे म्हणणे आहे. मोदींना रावण म्हटल्याने गुजरातच्या लोकभावना भडकू लागल्या, पण छत्रपतींच्या अपमानानंतर मराठी जनता भडकताच हा म्हणे विरोधकांचा डाव आहे, असे भाजप सांगत आहे. यावरून भाजपचे शिवराय प्रेम हे ढोंग असल्याचे सिद्ध होते' अशी टीकाही शिवसेनेनं केली.

(ते काय स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात जाऊन आलेत का, संजय राऊंतांवर शिंदे गटाच्या मंत्र्यांचा प्रहार)

'छत्रपतींचा अपमान राज्यपाल कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व राज्याचे पर्यटनमंत्री लोढा यांनी केला. लोढा हे बिल्डर आहेत व त्यांनी बांधलेल्या गृहसंकुलात मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश नाकारला गेल्याचे प्रकरण गाजले होते. आताही तीच परिस्थिती आहे. इतिहास काळात लोढा हे बिल्डर असते व छत्रपतींच्या मावळय़ांनी, सरदारांनी त्यांच्या गृहसंकुलात प्रवेश केला असता तर त्यांची काय भूमिका असती? कारण मावळे हे तसे मांसाहारीच होते व आहेत. लोढा यांनी मावळय़ांनाही ते मांसाहारी आहेत म्हणून बंदीच घातली असती. त्यामुळे याबाबतीतही धोरण ठरले पाहिजे. छत्रपतींवर अद्वातद्वा बोलण्यातच मंत्र्यांचा वेळ चालला आहे. इतिहास चिवडण्याचे कामही काही लोकांनी वेगाने सुरू केले. वेडात दौडलेल्या सात मराठी वीरांवरच आक्षेप घेतल्याने आता नवा इतिहास लिहावा लागतो की काय? असा सवालही सेनेनं केला.

First published: