S M L

'चलो अयोध्या, चलो वाराणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी

"मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे"

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2018 10:26 AM IST

'चलो अयोध्या, चलो वाराणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी

मुंबई, 26 जुलै : "मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे" शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ऐतिहासिक घोषणेनंतर, शिवसेनेतुन उत्सफुर्दपणे पहिली प्रतिक्रिया बघायला मिळालीय ती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची. 'चलो अयोध्या.. चलो वारणसी' चे आवाहन करणारे होर्डिंग त्यांनी मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात लावले आहेत. राज्यातून देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका ठरणाऱ्या या घोषणेच्या या होर्डिंगची सध्या मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कट्टर हिंदुत्व आणि त्यात ही उत्तर भारतीय मतदार शिवसेनेची जमेची बाजू होती पण गेल्या तार वर्षात भाजपाने मुंबई आणि एमएमआरडीए विभागात उत्तर भारतीय मत स्वतकडे वळवली त्याचाच भाग म्हणून की काय आता शिवसेना आयोध्या आणि वाराणसी याच्या गोष्टी करू लागली आहे. मुंबईत मराठी टक्कावर लोकसभा आणि विधानसभा जागा जिंकणे शक्य नाही यामुळे प्रादेशिक विचार करणारी शिवसेना उत्तर भारतीयांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारे आयोध्या आणि वाराणसी यांच्या गोष्टी करत भाजपाला अप्रत्यक्ष आवाहन देत आहे. भविष्यात राम मंदिर झालेच तर मतांची अंकगणित स्वत:च्या पारड्यात पाडण्याची हालचाल आतापासूनच शिवसेना करू पाहत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पाकिस्तानात सगळ्यात मोठी पार्टी ठरली इम्रान खानची 'तेहरीक-ए-इन्साफ'

पण प्रश्न असा निर्माण होतो की महाराष्ट्रात पूर्ण सत्ता कधीही न मिळालेल्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात कितपत यश मिळणार आहे. गुजरात आणि गोव्यातही सेनेनं आपलं नशीब आजमावून पाहिलं होतं. पण तिथेही हाती काहीच लागलं नाही.'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी'

दरम्यान, नोटबंदी एक क्षणात झाली तसं राम मंदिर का नाही होऊ शकत? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांआधी उपस्थितीत केला होता. राम मंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या? असा सवाल त्यांनी केला होता. शिवाय नोटाबंदी एक क्षणात झाली, तसे राम मंदिर का होऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा...

Loading...
Loading...

मराठा आंदोलनाबाबत राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं ?

दिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलन

काकासाहेबाने ज्या पुलावरुन उडी घेतली, त्याबद्दल संभाजी ब्रिगेडने घेतला 'हा' निर्णय

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 08:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close