शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता, उद्धव ठाकरे करणार आमदारांशी चर्चा

शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता, उद्धव ठाकरे करणार आमदारांशी चर्चा

हाता तोंडाशी आलेला घास जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय त्यामुळे आमदार अस्वस्थ असून ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करणार आहेत.

  • Share this:

मुंबई 19 नोव्हेंबर : राज्यात सत्तास्थापनेसाठी विलंब होत असल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. फक्त आमदारच नाही तर कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेसची चर्चा सुरू केली. या जुळवाजुळवीलाही आता अनेक दिवस होत असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न आता सेनेतूनच विचारला जातोय. दररोज फक्त बैठका होत असल्याने त्यातून काहीही निघत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर हाता तोंडाशी आलेला घास जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करणार आहेत.

शुक्रवारी सर्व आमदारांना मातोश्रीवर बोलविण्यात आलं असून या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना वस्तुस्थिती सांगणार आहेत. या बैठकीत ते कुठला संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.

सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचा भाजप-सेनेला सल्ला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे, असं म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नंतरच्या काळात शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची बोलणी सुरू केली. मात्र पुन्हा शरद पवार यांनी गुगली टाकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यातील बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा संभ्रम दूर होईल, अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सत्तास्थापनेबाबत तुम्ही भाजप आणि शिवसेनेला विचारा, असं म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर शिवसेनाही गोंधळात पडली आहे. यातूनच शिवसेनेनं प्लॅन बी तयार करावा, अशी मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे.

राष्ट्रपती राजवटीचं इंग्लंड कनेक्शन, 'या' क्रिकेटपटूनं 2014मध्ये केलं होतं भाकित

'शिवसेनेनं आता राष्ट्रवादीसोबत चर्चा करणं थांबवून पुन्हा भाजपसोबत चर्चा करावी,' असा मतप्रवाह शिवसेनेत तयार होत आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने पक्षाकडे अशी मागणी केली आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाईम्स' या दैनिकाने वृत्त दिलं आहे. त्यामुळे शिवसेना खरंच पुन्हा यू-टर्न घेत सत्तास्थापनेसाठी भाजपच्या पर्यायाचा विचार कऱणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

Tags:
First Published: Nov 19, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading