मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ईडीचा माणूस भाजप कार्यालयात अडकला असेल, राऊतांची खोचक प्रतिक्रिया

ईडीचा माणूस भाजप कार्यालयात अडकला असेल, राऊतांची खोचक प्रतिक्रिया

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 28 डिसेंबर : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नीना ईडीने नोटीस (ED Notice) बजावल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.  'मी कालपासून ईडीची नोटीस शोधत आहे. मी काहीही सांगत नाही. भाजपचीच लोकं नोटिसीबद्दल बोलत आहे. माझा माणूस मी भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित त्यांच्या कार्यालयात नोटीस अडकली असेल' अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीसवर आपली प्रतिक्रिया दिली.  'ईडीने बजावलेली कोणतीही नोटीस मला अजून मिळालेली नाही. भाजपचे नेतेच ईडीच्या नोटिसीबद्दल बोलत आहे. त्यामुळे मी माझा माणूस हा ईडी कार्यालयात पाठवला आहे. कदाचित नोटीस ही कार्यालयात अडकली असेल. त्यांचा माणूस आता नोटीस घेऊन निघाला असेल' असं राऊत म्हणाले.

शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच काढला काटा!

'हे राजकारण आहे. त्यांना काय राजकारण करायचे आहे, ते करू द्या. मी नोटीस शोधत आहे आहे. कदाचित भाजप कार्यालयातून निघाली असेल. पण या प्रकरणावर दुपारी शिवसेना भवनात सविस्तर बोलणार आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पीएमसी बँक संदर्भात राऊत यांचे आधी काही संबंध होते का याचा खुलासा राऊत करतील का? त्यांनी ईडीला सहकार्य करावं, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली . तर दुसरीकडे, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचे समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस आली की सूडाचं राजकारण असं कसं म्हणतात? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.

अन् 'तो' यशाचा टर्निंग पॉईंट ठरला! रतन टाटांनी असा घेतला होता अपमानाचा बदला

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली, तर अगदी अलीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं.

First published: