Home /News /mumbai /

...पण सत्तेपुढे शहाणपण नसतं, संजय राऊतांचं मोठं विधान

...पण सत्तेपुढे शहाणपण नसतं, संजय राऊतांचं मोठं विधान

सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपले पाय प्रत्येकाने तपासले पाहिजे, नक्की जमिनीवर आहेत का?

  मुंबई, 21 मार्च : मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. 'सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. काही गोष्टींवर योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित होतं पण सत्तेपुढे शहाणपण नसतं. माझ्या ट्वीटचा अर्थ लवकरच कळेल, असं सूचक विधान शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रावर संजय राऊत यांनी मुंबई पत्रकारांशी बोलत असताना आपली भूमिका मांडली. 'महाराष्ट्रात नक्कीच हा चर्चेचा विषय आहे. नक्कीच सनसनाटी आणि खळबळजनक असे माजी पोलीस आयुक्तांचे पत्र आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब आहे.  मात्र यात सत्यता किती आहे.  हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार तपासून बघतील. स्वतः अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे, असं राऊत म्हणाले. Param Bir Singh Letter मुळे राष्ट्रवादीत खळबळ, पवारांनी दिल्लीत बोलावली बैठक तसंच, झालेल्या प्रकारानंतर प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आशा प्रकारचे आरोप होत आहे हे दुर्दैवी आहे. ज्यांनी हे सरकार यावं म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायक आहे,  सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपले पाय प्रत्येकाने तपासले पाहिजे, नक्की जमिनीवर आहेत का? असा सवालही राऊत यांनी केला. माझी यात वैयक्तिक भूमिका नाही. मात्र पोलीस प्रशासन  हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. महाराष्ट्राला कणा आहे असं आपण म्हणतो. पोलिसांकडे आम्ही कणा म्हणून पाहतो. आमची राजवट देखील उत्तम चालली आहे, पण काही तरी दुरुस्त करावं लागेल, असंही राऊत यांनी कबूल केलं. चोरी करण्याचा प्रयत्न आला अंगलट, शेवटी पोलिसांचीच घ्यावी लागली मदत आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त आहेत. एका प्रकरणात त्यांना पदावरून जावं लागलं आहे. त्यांच्या कामाबाबद्दल कौतुक आहे. पण त्यांच्या पत्रावर तपास करावा असे स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. योग्य भूमिका आणि निर्णय घेण्यासाठी शरद पवार हे भूमिका पार पाडतील. मी पवार साहेबांशी दिल्लीत भेटलो आहे. असंही राऊत म्हणाले. विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही. 72 तासात सरकारवर शिंतोडे उडाले हे मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे आहे, कारण मी सरकारचा 4 पैशांचा देखील ओशाला नाही. यातून कसं पुढे जायायं यासंदर्भात एकत्र बसून निर्णय  घेतला जाईल.  मुख्यमंत्र्यानी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.  काही गोष्टींवर योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित होत पण सत्तेपुढे शहाणपण नसतं. माझ्या ट्वीटचा अर्थ लवकरच कळेल, असं सूचक विधान राऊत यांनी केलं.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: संजय राऊत

  पुढील बातम्या