‘मेट्रोशेड’च्या वादावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Mumbai Metro Car shed कायम केंद्र सरकारवर तोफ डागणाऱ्या राऊत यांनी यावर सावध भूमिका घेत प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घेतल्याचं बोललं जात आहे.

Mumbai Metro Car shed कायम केंद्र सरकारवर तोफ डागणाऱ्या राऊत यांनी यावर सावध भूमिका घेत प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घेतल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:
    मुंबई, 3 नोव्हेंबर : मुंबईतल्या 'मेट्रो कारशेड (Metro car shed )च्या वादाने आता वेगळं वळण घेतलं आहे. केंद्र सरकारने कांजुरमार्गच्या (kanjurmarg) जागेवरून आक्षेप घेतल्याने आता राज्य सरकार कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागलं आहे. राज्य सरकारचा किल्ला ठामपणे लढवणारे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. केंद्र सरकार यात खोडा घालत असल्याचा आरोप होत असताना राऊत यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होते. राऊत म्हणाले, हा विषय राज्य सरकार हाताळत आहे. त्यामुळे यावर तेच प्रतिक्रिया व्यक्त करतील. राज्य सरकार त्यावर योग्यपद्धतीने काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपचे नेते आशिष यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका केली होती त्यावर विचारलं असतानाही त्यांनी विषयाला बगल दिली. हा विषय सरकारचा आहे सरकार बोलेल असंही त्यांनी सांगितलं. कायम केंद्र सरकारवर तोफ डागणाऱ्या राऊत यांनी यावर सावध भूमिका घेत प्रकरण चिघळणार नाही याची काळजी घेतल्याचं बोललं जात आहे. मेट्रो कारशेडला  कांजूरमार्गला  हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. भाजपने  (BJP) राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता.  पण, आता या वादात केंद्र सरकारनेही उडी घेतली आहे. केंद्र सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. याबद्दल केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवले आहे. आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प हा कांजूरमार्ग इथं हलवला आहे.  त्यानंतर कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात देखील झाली आहे. पण, आता केंद्र सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर दावा केला आहे. ठाकरे सरकारचा डाव तर नाही ना? मेट्रो कारशेडवरून भाजप नेत्याची सडकून टीका कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची  असून त्यावरचा हक्का अद्याप सोडला नाही, त्यामुळे ही जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा, असे पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवले आहे.  त्याचबरोबर कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबावा, असंही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईचा विकास कसा रोखायचा यासाठी केंद्रातील सरकार नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाचे काम थांबविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केली आहे. गोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी? 'राज्य सरकारने पर्यावरणाचा संरक्षण करत आरे येथील प्रकल्प कांजूरमार्गाला हलविला होता. पण, आता भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने या मुद्द्यावरून राजकारण करत आहे यावरून हेच स्पष्ट होते की, महाविकास आघाडीचे सरकार भाजपाला पचनी पडत नाही. या पद्धतीने इतर राज्यांमध्ये भाजप कार्यरत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील हेच पावले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असंही  असलम शेख म्हणाले.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: