Home /News /mumbai /

संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्ला सुरूच, शायरीच्या अंदाजातून लगावला सणसणीत टोला

संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्ला सुरूच, शायरीच्या अंदाजातून लगावला सणसणीत टोला

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदारांनी उघडपणे राऊतांवर गंभीर आरोप केले

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदारांनी उघडपणे राऊतांवर गंभीर आरोप केले

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदारांनी उघडपणे राऊतांवर गंभीर आरोप केले

    मुंबई, 28 जून  :  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde ) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेमध्ये मोठा संषर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. पण, जहालत (मुर्खपणा) हे एका प्रकारे मृत्यूच आहे, अशा शायरीच्या अंदाजात संजय राऊत (sanjay raut) यांनी शिंदे गटाला फटकारून काढलं. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि संजय राऊत असा सामना रंगला आहे. आताही संजय राऊत यांनी ट्वीट करून शिंदे गटाला डिवचलं आहे. राऊतांनी एक शायरीच्या फोटो ट्वीट करून टोला लगावला आहे. 'जहानत एक किस्म ही मौत होती है, और जाहील लोग चलती फिरती लाशे हैं' असं म्हणत संजय राऊत यांनी 40 लोकांचे मृतदेह गुवाहाटीवरून येतील या वक्तव्यावर एका प्रकारे खुलासा केला आहे. दरम्यान, ईडीने संजय राऊत यांनी समन्स बजावलं आहे. ईडीने त्यांना उद्या म्हणजेच मंगळवारी चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश दिले आहे. मात्र, आपल्याला उद्या चौकशीसाठी हजर राहाता येणार नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. माझी अलिबागला सभा आहे आणि इतरही अनेक ठिकाणी सभांचं आयोजन केलं आहे. त्यामुळे मंगळवारी मी त्या सभेला जाणार आहे आणि ईडीकडे वेळ मागणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. उद्या ईडीच्या कार्यालयात गेलो नाही, तर चौकशीसाठी नक्की हजर राहील. कारण मी पळ काढणारा नाही. कायदेशीर प्रक्रियाला सामोरं जाईल, असंही राऊत म्हणाले. (जिम सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? पाहा काय सांगतात ट्रेनर) 'तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी मी घाबरणार नाही. गुवाहाटीमध्ये जाण्यापेक्षा खोट्या आरोपात तुरुंगात गेलो तरी चालेल. तुम्ही माझा गळाही कापला तरी मी गुवाहाटीला जाणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार आणि ती वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, असंही राऊत म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या