मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

संजय राऊत यांची 'पद्मश्री'साठी झाली होती शिफारस, पण...

संजय राऊत यांची 'पद्मश्री'साठी झाली होती शिफारस, पण...

 या पुरस्कारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून 98 जणांची यादी पाठवण्यात आली होती. परंतु,

या पुरस्कारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून 98 जणांची यादी पाठवण्यात आली होती. परंतु,

या पुरस्कारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून 98 जणांची यादी पाठवण्यात आली होती. परंतु,

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 26 जानेवारी : देशाचा सर्वोच्च पुरस्कारापैकी समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार (padma awards 2021) जाहीर करण्यात आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98 मान्यवरांची यादी केंद्राकडे पाठवण्यात आली होती. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांचं सुद्धा नाव होतं.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. 119 जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून 98 जणांची यादी पाठवण्यात आली होती. परंतु, यापैकी फक्त एकाच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. उर्वरीत 97 नावावर केंद्र सरकारने फुली मारली आहे, असे वृत्त महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाने दिले आहे.

राज्य सरकारकडून  'पद्मविभूषण' पुरस्कारासाठी उद्योगपती मुकेश अंबानी, सुनील गावस्कर यांच्या नावाची शिफरस केली होती. तसंच 'पद्मभूषण' पुरस्कारासाठी सिंधुताई सपकाळ, 'सीरम' इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, स्कायडायव्हर शीतल महाजन, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे सुचावली होती. परंतु, केंद्राकडून पद्मभूषण ऐवजी पद्मश्री पुरस्कार सिंधुताईंना देण्यात आला.

पद्मश्री पुरस्कारासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासह 88 नावे पाठवली होती.

पद्मश्री पुरस्कारामध्ये फासेपारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभूणे, सिंधुताई सपकाळ, जसवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, परशूराम गंगावणे यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये  मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालासुब्रमण्यम यांना देण्यात आला आहे. तर तरुण गोगोई आणि रामविलास पासवान, केशुभाई पटेल या राजकीय नेत्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण, तर दिवंगत गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा यावेळी सन्मान केला जातो. यामध्ये मरणोत्तरही पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षीही सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांना सन्मानित करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Republic Day