मुंबई, 23 नोव्हेंबर : 'महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांचे ताळतंत्र सुटले आहे. ते काय बोलताय याचे त्यांना भान राहिले नाही. शरद पवार यांना जे छोटे नेते म्हणत आहे, त्यांना राजकारणाची उत्तुंगता पाहणे झेपले नाही', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना फटकारून काढले.
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसंच, पहाटे झालेल्या शपथविधी सोहळ्यावरून भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
'ती पहाट नव्हती, तो अंधकारच होता. त्या अंधकारामध्ये सत्तेची प्रकाशकिरणे परत कधीच दिसणार नाहीत. चार वर्षानं पुन्हा आम्हीच जिंकणार आहोत. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेले नाहीत. आम्हाला धक्का काही बसला नव्हता. त्या स्मृती आनंददायक आहेत. त्या पहाटेनंतर त्यांना धक्के बसलेत, ते अजून सावरलेले नाहीत' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.
मुलाला मुखाग्नी देताना पाहून अश्रू अनावर, शहीद संग्राम पाटील अनंतात विलीन
'शरद पवार यांना जे छोटे नेते म्हणत आहे, त्यांना राजकारणाची उत्तुंगता पाहणे झेपली नाही. मोदी सरकारनेच शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. हे बहुदा चंद्रकांत पाटलांना माहिती नसावे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती घ्यावी. पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते, हे ही लक्षात घ्यावे, असा टोलाही राऊत यांनी पवारांना लगावला.
'चंद्रकांत पाटील आणि भाजपमध्ये वैचारिक दरी निर्माण झालेली आहे. किंवा पंतप्रधान मोदी जे काही सांगत आहे, त्यांचा संदेश नेत्यांसोबत पोहोचत नाही. किंवा हे नेते पंतप्रधान मोदींना जुमानात नाही. तुम्ही राजकारण नक्की करा, पण व्यक्तिगत स्तरावर बोलत असताना राजकीय उत्तुंग स्तरावर असलेल्या नेत्यांबद्दल इतक्या खालच्या स्तराला जावून तुम्ही बोलू नका' असा सल्लाही राऊत यांनी दिला.
गाय बांधण्यावरून 2 गटांमध्ये झाला वाद, तुफान हाणामारीचा VIDEO VIRAL
तसंच, 'राज्यपाल व सरकारमध्ये संघर्ष नाही. ते घटनाबाह्य काम करून देशात बदनाम होतील असं मला वाटत नाही.
ते अत्यंत संत सज्जनासारखे राज्यपाल आहेत. इतका संत व सज्जन राज्यपाल मी महाराष्ट्रात पाहिलेला नाही. अत्यंत सरसोट राजकारण करणारे ते नेते आहेत' असं म्हणत राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.