मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आणीबाणीवरून पुनः पुन्हा दळण का दळायचे? संजय राऊतांचा थेट सवाल

आणीबाणीवरून पुनः पुन्हा दळण का दळायचे? संजय राऊतांचा थेट सवाल

22 वर्षांच्या मुलीस मोदी प्रशासनाने इतके का घाबरावे? जगातील सगळ्य़ात मोठ्या लोकशाहीस हे शोभते काय?

22 वर्षांच्या मुलीस मोदी प्रशासनाने इतके का घाबरावे? जगातील सगळ्य़ात मोठ्या लोकशाहीस हे शोभते काय?

22 वर्षांच्या मुलीस मोदी प्रशासनाने इतके का घाबरावे? जगातील सगळ्य़ात मोठ्या लोकशाहीस हे शोभते काय?

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 07 मार्च : 'आणीबाणी (emergency) चुकीची होती अशी खंत आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केली. तशी गरज होती काय? आणीबाणीतील चुकीच्या घटनांबद्दल जनतेने इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना धडाही शिकवला व नंतर माफ करून पुन्हा सत्तेवरही आणले. आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?' असा सवाल शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थितीत केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या (Samana) रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आणीबाणीच्या विधानावरून भाजपवर निशाणा साधला  आहे.

'आणीबाणीची घटना ही चुकीची होती हे माझ्या आजीने वारंवार मान्य केले आहे, सध्याची देशातील परिस्थिती त्या वेळेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, असे मत  राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी हे सरळ आणि मोकळ्या मनाचे आहेत. आणीबाणीवर ते सहज बोलून गेले आणि त्यावर दळण सुरू झाले, चर्चा सुरू झाली. 1975 साली इंदिरा गांधी यांनी एका विशिष्ट परिस्थितीत देशावर आणीबाणी लादली. त्यास एक कालखंड उलटून गेला. ज्यांचा आणीबाणीशी कधीच संबंध आला नाही अशी पिढी राजकारणात, पत्रकारितेत आहे. त्या कालखंडाचा साधा चरोटाही अंगावर उठला नाही असे लोक केंद्रीय मंत्रिमंडळात आणि राज्याराज्यांत सत्तेवर आहेत, पण भारतीय जनता पक्षाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत याचे आश्चर्य वाटते. आज देशाची परिस्थिती ‘आणीबाणी बरी होती’ असे म्हणावे अशीच आहे' असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

वेदिका देत आहे दुर्धर आजाराशी लढा, द्यावे लागणार 16 कोटींचे इंजेक्शन

'तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह चारजणांवर आयकर विभागाने छापे मारले. हे चौघे सतत देशातील सद्यस्थितीवर खुलेपणाने बोलत असतात. कदाचित टीकाही करीत असतात. आता या चारजणांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले हे चारजण सोडून बाकी सगळे ‘साव’ आहेत. दिशा रवीचे प्रकरण ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने मोदी राजवटीतील अघोषित आणीबाणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा रवी या फक्त 22 वर्षांच्या पर्यावरणवादी कार्यकर्तीस सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली सरळ तुरुंगात टाकले. शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीशी तिचे संबंध जोडून ही कारवाई मोदी प्रशासनाने केली, असे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ म्हणतेय. 22 वर्षांच्या मुलीस मोदी प्रशासनाने इतके का घाबरावे? जगातील सगळ्य़ात मोठ्या लोकशाहीस हे शोभते काय?' असा सवाल राऊत यांनी विचारला.

'त्यामुळे आज वेगळे काय चालले आहे? हा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला तो योग्यच आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनांसंबंधी तीच बेफिकिरी, तीच विलासी राहणी. वृत्तपत्रांसह मीडिया हाऊसेसवर राजकीय नियंत्रण. निवडणुका जिंकण्यासाठी, विरोधकांना खच्ची करण्यासाठी त्याच क्षुद्र कारवाया, तेच डावपेच. घटनात्मक संकेत पायदळी तुडविण्याबाबत तोच उतावीळपणा. सर्व काही 1975 प्रमाणेच तर सुरू आहे. क्रांतीच्या नावाने तोच बेशरमपणा, दोन-चार लोकांभोवती गोंडे घोळणारी तीच लाचारी. त्या वातावरणात खरेच काही बदल झाला आहे काय? असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला.

20 वर्षांनी न्याय,SIMIचे सदस्य असल्याचा आरोप असलेल्या 122 जणांची निर्दोष मुक्तता

'आणीबाणीच्या काळात एकामागून एक घटनादुरुस्त्या मंजूर करून घेतल्या. लोकसभेचे सार्वभौमत्व तेव्हा संपले होते. मला आठवते, पंतप्रधानांना कोर्टापुढे यावे लागू नये यासाठी एक घटनादुरुस्ती करण्यात आली होती. पंतप्रधानांबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यावर निवडणुकीसंबंधीचे कोणतेही दावे कोर्टात घालता येणार नाहीत असे ठरवणारा कायदा याच काळात संमत केला होता', असंही राऊत यांनी सांगितले.

मोठी बातमी : बबली गँगच्या दोन्ही तरुणी पोलिसांच्या ताब्यात

'संप, बंद, घेराव यांनी त्या काळात उच्छाद मांडला होता. सर्वसामान्य जीवनाची अवस्था या ‘बंद’वाल्यांनी बिकट करून सोडली होती. राजकीय खून व स्फोट घडविले जात होते. हे राष्ट्रावरचे संकटच होते. इंदिरा गांधी यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत असूनही देशात राजकीय अस्थिरता वाढू लागली. त्यातून आणीबाणीचा भस्मासुर उदयास आला, पण पुन्हा आणीबाणी आणणार नाही या इंदिराजींच्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला व फक्त तीन वर्षांत पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. म्हणजे जनतेने त्यांना माफच केले. मग राहुल गांधी यांना आजीच्या निर्णयाबद्दल माफी मागायचे कारण काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. तो कायमचाच जमिनीखाली गाडला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

First published:

Tags: BJP, Mumbai, PM narendra modi, Rahul gandhi, Sanjay raut, Shivsena, Sonia gandhi