Home /News /mumbai /

'रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता', राऊतांचा मोदींना टोला

'रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता', राऊतांचा मोदींना टोला

हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच ‘गोध्राकांड’ आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले'

    मुंबई, 14 फेब्रुवारी : 'पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली आहे. आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून काश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. त्या भाजपचे पंतप्रधान मोदी ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो' अशा शब्दांत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Narendra modi) टीका केली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा आहे' अशी टीका राऊत यांनी केली. 'पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे आज ‘आंदोलना’ची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्स्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच ‘गोध्राकांड’ आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले', अशी आठवणच राऊत यांनी मोदींना करून दिली. SBIच्या या खास योजनेत करा गुंतवणूक; कधीही पैसे जमा करण्याची मुभा 'गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा केला आहे. ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह शेतकऱयांनी केला व त्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी केले. पटेलांचे फक्त पुतळे निर्माण करून काय होणार? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे ‘आंदोलनजीवी’ होते. कायदेभंग, परदेशी कापडाची होळी, चले जाव, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांनी गांधीजींनी देश एका झेंडय़ाखाली एकवटवला, एकजिनसी केला. गांधीजींची उपोषणे हेसुद्धा आंदोलनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. अस्पृश्यांच्या अस्मितेसाठी लढा दिला. ते आंदोलन नव्हते तर दुसरे काय होते?' असा सवालही राऊत यांनी उपस्थितीत केला. सत्याग्रह हा हिंदुस्थानने जगापुढे ठेवलेला बंदुकीला वैशिष्ट्यपूर्ण पर्याय असल्याचे राम मनोहर लोहियांनी सांगितले. त्या लोहियांचा पुतळाही संसद भवनात आहे. जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरुद्ध दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा पुकारला. त्याच आंदोलनाने इंदिरा गांधींची सत्ता उलथवून टाकली. हे आंदोलन परजीवी होते काय? कारण त्याआधी इंदिरा गांधी सातत्याने आदळआपट करीत होत्या की परकीय शक्ती देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी यांचा ‘परजीवी’ सिद्धांत स्वीकारला तर इंदिरा गांधींचे ते सांगणे खरेच होते. पुढे इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे खून त्याच परकीय शक्तीने केले असे आरोप झाले. Madhubala : नवव्या वर्षी केली अभिनयाला सुरूवात, आयुष्याचा शेवट झाला वेदनादायी आज भारतीय जनता पक्षाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी प्रेमाचे भरते आले आहे. नेताजींचे ‘आझाद हिंद सेना’ हे एक आंदोलनच होते. त्यांनी ‘चलो दिल्ली’ अशी रोमहर्षक घोषणा देत हिंदुस्थानी सैनिकांत स्वातंत्र्याची आकांक्षा पेटविली. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा!’ ही घोषणा एक आंदोलनच होते. 'पंजाबात लाला लजपत राय हे शेतकऱ्यांचे नेते होते. ब्रिटिश लाठीमारात ते मरण पावले. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील, किसन वीर, नाना पाटील ही शेतकऱ्यांची पोरेच लढा देत होती. प. बंगालात राजा राममोहन रॉय यांनी सामाजिक सुधारणांसाठी लढा दिला. सतीची चाल बंद करावी लागली. हे आंदोलनच होते. दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडले तेव्हा दिल्लीच्या रस्त्यांवर आणि संसदेत आंदोलन करणारे भाजपचेच लोक होते. आता एखाद्या निर्भयावर अत्याचार झाला तर ‘हाथरस’प्रमाणे तिला अंधारात पोलीस गुपचूप जाळून टाकतील व त्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवतील. अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहात आहे ते शेकडो करसेवकांच्या बलिदानातून. हे सर्व हुतात्मे परकीय हस्तक किंवा परजीवीच होते, असेच आता म्हणावे लागेल', असा टोलाही राऊत यांनी लगावला. 'एकेकाळी काँग्रेस पक्ष हेच एक आंदोलन होते. आज काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसचा इतिहास जितका आंदोलनाचा आणि संघर्षाचा आहे तितका तर भाजपचा नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनांत भाजप कुठेच नव्हता. वीर सावरकर यांचे स्वातंत्र्याचे आंदोलन सशस्त्र होते व त्याबद्दल त्यांना इंग्रज सरकारने 50 वर्षांच्या काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावली. अंदमानातून सुटल्यावर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, भाषाशुद्धीसारखी आंदोलने केली. वीर सावरकरांना भारतरत्न करण्यात आले नाही. निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका', असा टोलाही राऊत यांनी लगावला. सुरक्षित आणि खात्रीलायक रिटर्न्ससाठी कोणता पर्याय आहे सर्वांत बेस्ट? 'भारतीय जनता पक्षाची सर्व आंदोलने झाली. ती मग फक्त राजकीय हितासाठी व सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल. काश्मीरातून 370 कलम हटवणे हे भाजपच्या जीवनातले सगळ्यात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता ‘आंदोलनजीवी’ ठरवले गेले. क्रांतिकारक सत्तेवर येताच सगळ्यात आधी क्रांतीच्या पिलांचा बळी घेतो. आपल्या देशात हेच सुरू आहे काय?' असा सवालही राऊतांनी थेट मोदींना विचारला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: PM narendra modi, Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या