शरद पवार यांच्या 'त्या' पत्राबद्दल संजय राऊत म्हणाले...

शरद पवार यांच्या 'त्या' पत्राबद्दल संजय राऊत म्हणाले...

'2010 ची परिस्थिती वेगळी होती आणि आजची वेगळी आहे. पवार हे कृषीक्षेत्रातील तज्ज्ञ आहे, ते त्याबद्दल खुलासा करतील'

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर : कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला (Farmer Protest) आता शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीनेही (NCP) पाठिंबा दिला आहे. पण, एपीएमसी कायद्याला पाठिंबा दिल्याचे शरद पवार यांचे पत्र समोर आले आहे. याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, याबद्दल शरद पवार हेच बोलतील' असं सांगितलं आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना उद्याच्या भारत बंदला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांनी एपीएमसी कायद्याला शरद पवारांनी पाठिंबा दिला होता, असं पत्र समोर आले आहे, याबद्दल विचारले असता संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

'2010 ची परिस्थिती वेगळी होती आणि आजची वेगळी आहे.  पवार हे कृषीक्षेत्रातील तज्ज्ञ आहे, ते त्याबद्दल खुलासा करतील. शेतकरी नेता हा शेतकऱ्यांच्या भावनाशी सहमत असतो. लाखो शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरले आहे, तेव्हा त्यादृष्टीने ते बोलतील' असं सांगत  संजय राऊत यांनी बोलण्याचे टाळले.

'भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिल्याचे काल आम्ही जाहीर केले आहे. हा बंद फार वेगळ्या प्रकारचा आहे. जो शेतकरी आहे, तो संकट काळात राबत असतो, अस्मानी संकट असो सर्व संकटांशी शेतकरी सामना करत आहे. लॉकडाउनमध्ये सगळे घरी बसलेले असताता त्याने आपल्याला साथ दिली, शेतकऱ्यांनी आज आपल्याला साद दिली आहे.  त्याला आपली गरज आपण त्याला साथ द्यायला हवी. जनतेनं स्वच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं. त्यामुळे हा बळीराजांना खरा पाठिंबा ठरेल' असं आवाहन राऊत यांनी केले.

पवारांच्या पत्रात काय होते?

दिल्लीचे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना शरद पवारांनी 2010 साली एक या विषयावर पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी देशाच्या ग्रामीण भागात विकास, रोजगार आणि आर्थिक समृद्धीसाठी कृषी क्षेत्राचे योग्य प्रकारे नियंत्रण करणाऱ्या बाजाराची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. राज्यातील APMC कायद्यांमध्ये बदल करण्याची इच्छा देखील पवारांनी व्यक्त केली होती. त्यासाठी शीतगृह (Cold Storage) सह व्यापाऱ्यांमधील अनेक गोष्टींमध्ये बदल आवश्यक आहेत. हे बदल खासगीकरणाच्या माध्यमातून होऊ शकतात. त्याचे योग्य प्रकारे नियंत्रण करणारी व्यवस्था असणे आवश्यक आहे, अशी पवारांची भूमिका होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिलेल्या पत्रातही पवारांनी विपणन व्यवस्थेत बदल करणे आवश्यक असून यामध्ये खासगी क्षेत्र महत्वाची भूमिका बजावू शकते, असे मत व्यक्त केले होते.

Published by: sachin Salve
First published: December 7, 2020, 11:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या