मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राम मंदिर भूमिपूजन संपन्न झाले, संजय राऊतांनी केली नवी घोषणा

राम मंदिर भूमिपूजन संपन्न झाले, संजय राऊतांनी केली नवी घोषणा

अयोध्या काही कुठल्या  एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही. अयोध्या हे राष्ट्राच्या एकात्मतेचं प्रतिक आहे.'

अयोध्या काही कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही. अयोध्या हे राष्ट्राच्या एकात्मतेचं प्रतिक आहे.'

अयोध्या काही कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही. अयोध्या हे राष्ट्राच्या एकात्मतेचं प्रतिक आहे.'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 05 ऑगस्ट : अयोध्येत राम जन्मभूमीत रामलल्लाचे मंदिराचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपवर टीका केली आहे. 'आजचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पुन्हा अयोध्येला जाणार आहोत. अयोध्या काही कुठल्या  एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही' अशी टीका राऊत यांनी केली. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना संजय राऊत यांनी राम मंदिर, सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणावर जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यावर परखड मत व्यक्त केले आहे. 'आज कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लोकांची गर्दी टाळणे गरजेचं होतं. लोकांनी गर्दी करण्यापासून लांब राहावं. मुळात राम सगळ्यांचे आहेत अयोध्या सर्वांची आहे.  आजचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पुन्हा अयोध्येला जाणार आहोत. अयोध्या काही कुठल्या  एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही. अयोध्या हे राष्ट्राच्या एकात्मतेचं प्रतिक आहे.' असंही म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसंच, ' आज राम मंदिराची पूजा होऊन जाऊ द्या. सगळं शांत होऊ द्या. मग ते आहेत आणि आम्ही आहोतच', असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला. शेतकऱ्याचा पोऱ्या तो! ना क्लास, ना पैसा; 5 वर्ष लढला पण आता IPS झाला 'आजच्या क्षणाची सर्वच जण वाट पाहत होते. हा क्षण जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा ज्या हजारो लोकांनी बलिदान दिलं. त्यांचं स्मरण आम्ही सर्वप्रथम केलं आहे. शरयू नदीचं पात्र कसं लाल झालं झालं होतं. कारसेवकांच्या रक्तानं आणि बलिदानानं, ते ज्यांनी डोळ्यांनी पाहिलं त्याच डोळ्यात आज आनंद अश्रू आहेत. त्यांचा त्याग आणि बलिदान आज खऱ्या अर्थाने कामी आलं. देश आज आनंदी आहे. तारखांवर तारखा पडत होत्या, आज अंतिम तारीख आली आणि आज मुहूर्तावर भूमिपूजन केले. देशात राम मंदिर भरपूर आहेत पण अयोध्येत राम जन्मभूमीत राम मंदिर होणं याला महत्व आहे.' अशी भावना राउत यांनी व्यक्त केली. Beirut Blast: बैरूतमध्ये झाला अणुबॉम्ब हल्ला? वाचा काय आहे या VIDEO मागचं सत्य तसंच, 'ज्या दिवशी बाबरीच्या घुमटावर शिवसैनिक असलेल्या कोठारी बंधूंनी हातोडे मारून तो उद्धवस्त केला त्यावेळी इतर देखील प्रमुख पक्षांचे लोकं होते. ज्या दिवशी ती बाबरी पाडली त्याच दिवशीच राम मंदिराचा पाया रचला गेला. बाळासाहेब ठाकरेंनी त्याचवेळी आशिर्वाद दिलेले आहेत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी अयोध्येत पाऊल ठेवलं,  तेव्हाच खऱ्या अर्थाने याला चालना मिळाली' असा दावाही राऊत यांनी केला.
First published:

पुढील बातम्या