मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

संसदेत 'मार्शल लॉ'च्या बुटाखाली लोकशाहीला चिरडताना पाहिलं', राऊतांचा हल्लाबोल

संसदेत 'मार्शल लॉ'च्या बुटाखाली लोकशाहीला चिरडताना पाहिलं', राऊतांचा हल्लाबोल

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बराच गदारोळ माजला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यदिनी सामनाच्या रोखठोकमधून केंद्र सरकारवर सवाल उपस्थित केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून देशात पेगासस हेरगिरी (Pegasus espionage) प्रकरण चांगलंच गाजत आहे. देशातील विविध नेत्यांना आणि पत्रकारांवर हेरगिरी केल्यामुळे विरोधी पक्षानं केंद्र सरकारला (Central Government) संसदेत धारेवर धरलं होतं. यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session of Parliament) बराच गदारोळ माजला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी स्वातंत्र्यदिनी सामनाच्या (Saamana) रोखठोकमधून केंद्र सरकारवर सवाल उपस्थित केला आहे.

आज देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. पण दुसरीकडे देशातील अनेक संस्थांचं स्वातंत्र्य मारलं जात आहे. संसद, न्यायालये, वृत्तपत्रांना आज मोकळेपणानं काम करण्याचं स्वातंत्र्य नाही. राजकीय विरोधकांना संसदेत बोलू दिलं जात नाही. तरीही ते बोलायला लागले तर त्यांना रोखण्यासाठी संसदेत ‘मार्शल’ची फौज उभी केली जाते. मग यालाच स्वातंत्र्य म्हणायचं का ?, असा बोचरा सवाल संजय राऊत यांनी आजच्या सामना अंकातून विचारला आहे.

हेही वाचा-...नाहीतर ED ची चौकशी मागे लावू; मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना धमकीचा मेसेज

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत लोकशाहीचा मुडदा पाडल्याचं चित्र दिसत आहे. संसदेतील 15 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात 4 तासही चर्चा झाली नाही. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर लोकशाही कशी कमजोर होते? आणि अशा बहुमताच्या जोरावर बेफाम प्रवृत्तीचे लोकं स्वार झाले की काय घडतं, याचा अनुभव सध्या देशाची राजधानी घेत आहे, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा-सेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या ऑफिसबाहेरचा पहिला VIDEO, कारमध्ये आढळले फटाके

सध्या लोकशाहीचा सुवर्णकाळ संपला आहे. सर्व काही अधोगतीच्या दिशेनं चाललं आहे. संसदेत झालेल्या गदारोळानंतर ज्यांनी लोकशाहीला 'मार्शल लॉ'च्या बुटाखाली चिरडताना पाहिलं त्यांनी लोकशाहीला श्रद्धांजली वाहून संसदेतून काढता पाय घेतला आहे, असा विचारही संजय राऊत यांनी आपल्या लेखातून मांडला आहे.

First published:

Tags: Sanjay raut, Shivsena