Home /News /mumbai /

फडणवीस हे काही आमचे शत्रू नाही, पण..., संजय राऊतांनी केला नवा खुलासा

फडणवीस हे काही आमचे शत्रू नाही, पण..., संजय राऊतांनी केला नवा खुलासा

देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नव्हते. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती.

    मुंबई, 27 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अखेर आज खुद्द संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुप्त भेटीबद्दल खुलासा केला आहे. 'देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. 'सामना'च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली होती. गप्पा मारल्या आणि एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे शत्रू नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो', असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. सुशांतवरील चित्रपटात दिसणार श्रद्धा कपूरचे बाबा, निभावणार NCB अधिकाऱ्याची भूमिका तसंच, 'देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नव्हते. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे.  महाराष्ट्रातील काही साहित्यक संस्था आहे. त्यांनीही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह आहे, असंही राऊत यांनी सांगितले. आता फक्त 30 हजारात खरेदी करा LED TV! हे आहे 5 उत्तम पर्याय राज्य सरकारचा व्यवस्थिती कारभार सुरू आहे. पाच वर्ष हे सरकार चालणार आहे. शरद पवार यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. उद्धव ठाकरे हे सरकारचे नेतृत्त्व करत आहे, त्यामुळे या भेटीतून कोणतेही समिकरण तयार होणार नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केले. 'भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार नाही. चर्चा करायची असले तर ती होऊ शकते. आपल्याकडे चर्चेला काही सेन्सारशिप नाही. पण चर्चेला रेशनिंग सुद्धा नाही, असंही राऊतांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या