Home /News /mumbai /

पत्नीसोबत संजय राऊत यांचा Couple Dance, तर सुप्रिया सुळेंसोबतही धरला ठेका, पाहा Video

पत्नीसोबत संजय राऊत यांचा Couple Dance, तर सुप्रिया सुळेंसोबतही धरला ठेका, पाहा Video

महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापनेसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे रोखठोक नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी लगीनघाई आहे.

  मुंबई, 28 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापनेसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे रोखठोक नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी लगीनघाई आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) सोमवारी (29 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार (Malhar) यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने मुंबईच्या रेनेन्सो या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये नुकतंच संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात संजय राऊत यांनी आनंदाच्या भरात ठेका धरला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कुटुंबासह हजर होत्या. या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया यांनी संजय राऊत यांच्यासोबत ठेका धरला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होतोय.

  संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

  पूर्वशी-मल्हार यांच्या लग्नानिमित्त आयोजित कार्यक्रमातील संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या एकत्र नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुरुवातीला संजय राऊत आणि सुप्रिया सुळे एकत्र नृत्य करताना दिसतात. त्यांनंतर सुप्रिया सुळे वधूमाय वर्षा राऊत यांचा हात पकडत त्यांना नृत्यासाठी आग्रह करतात. यावेळी वर्षा राऊत लाजत पतीसोबत ठेका धरतात. हेही वाचा : 'तुम्ही आमची भावकी निवडून दिलीय, निधीत कमी पडू देणार नाही', अजित पवारांचं आश्वासन

  पूर्वशीच्या लग्नाचे अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण

  पूर्वशी-मल्हार यांच्या लग्नात उद्या मोठमोठे दिग्गज बघायला मिळतील. विविध पक्षाचे मोठमोठे नेते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. काही महिन्यांपूर्वी पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेचे देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपस्थिती लावली होती. त्यावेळी फडणवीस आणि राऊत यांनी मारलेल्या मिठीची देखील चांगलीच चर्चा झाली होती. हेही वाचा : 'सौ दर्द छुपे है सिने में, मगर अलग मजा है जिने में', छगन भुजबळांचं शेरोशायरीतून विरोधकांना उत्तर दुसरीकडे लेकीच्या लग्नानिमित्ताने संजय राऊत यांच्या घरी अनेक दिवसांपासून तयारी सुरु आहे. राऊत लेकीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी अनेक नेत्यांच्या घरी देखील जावून आले होते. राऊत नुकतंच 9 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लेकीच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी सपत्निक राजभवनावर गेले होते. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. त्याचबरोबर संजय राऊत पू्र्वशीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यसाठी संजय राऊत यांच्या कृष्णकुंज येथील निवासस्थानी देखील गेले होते.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या