मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...आमचाही कार्यक्रम ठरला आहे, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

...आमचाही कार्यक्रम ठरला आहे, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

'एका स्त्रीचा पराभव करण्यासाठी दोन दोन महिने मोदी आणि शहा बंगालमध्ये तळ ठोकतात तेव्हा त्यांनी पराभव स्विकारावा'

'एका स्त्रीचा पराभव करण्यासाठी दोन दोन महिने मोदी आणि शहा बंगालमध्ये तळ ठोकतात तेव्हा त्यांनी पराभव स्विकारावा'

'एका स्त्रीचा पराभव करण्यासाठी दोन दोन महिने मोदी आणि शहा बंगालमध्ये तळ ठोकतात तेव्हा त्यांनी पराभव स्विकारावा'

  • Published by:  sachin Salve
मुंबई,  02 मे : 'भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devdendra fadanvis) यांनी कार्यक्रम सुरू करावा, आमचाही कार्यक्रम ठरलेला आहे. एक नाही तर दोन कार्यक्रम होतील' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला आहे. तसंच, 'एका स्त्रीचा पराभव करण्यासाठी दोन दोन महिने मोदी आणि शहा बंगालमध्ये तळ ठोकतात तेव्हा त्यांनी पराभव स्विकारावा' असा टोलाही राऊत यांनी लगावला. संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election Result) निकालावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'बंगालच्या वाघिणीचे अभिनंदन करतोय. तेथील जनतेने दबावात न येता मतदान करून प्रतिष्ठा कायम राखली. एक स्त्री, जखमी वाघीण एकटी लढली, केंद्राच्या एजन्सीचा दबाव असूनही त्या मागे हटल्या नाहीत. हा एक ऐतिहासिक विजय आहे' असं म्हणत राऊत यांनी ममतादीदींचं कौतुक केलं. IPL 2021: 8 वर्षांमध्ये पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नरवर 'ही' नामुश्की का आली? 'ममतादीदी एक जमिनीशी जोडलेल्या नेत्या आहेत. भाजपने बेसुमार खर्च करूनही तेथील जनतेनं ममता यांनाच निवडून दिलं आहे.  मोदी, शहा व नड्डा यांनी कोरोना नियमांचे भंग करून रॅली केल्या. देशाला यांनी कोरोना दिला. दिल्लीतून येवून दादागिरी चालणार नाही बंगाल व महाराष्ट्राने दाखवून दिले. महाराष्ट्रात काहीही फरक पडणार नाही. बंगाल व महाराष्ट्र भावनात्मकदृष्टया एकच आहेत, असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं ममतादीदींशी फोनवर  बोलणं झालं व त्यांचे अभिनंदन केलं आहे, अशी माहितीही राऊत यांनी दिली. 'भाजपनं कृत्रिम वादळ निर्माण केले होते. बंगालमध्ये, पण ते पोकळ वादळ होते. त्यामुळे देशाच्या राजकारणाला दिशा देणारा हा विजय आहे. कोरोनाचा पराभव करण्याऐवजी केंद्र सरकारहे ममतांच्या पराभवासाठी गेले होते. Ske स्त्रीचा पराभव करण्यासाठी दोन दोन महिने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा बंगालमध्ये तळ ठोकतात तेव्हा त्यांनी पराभव स्विकारावा, असं चिमटाही राऊतांनी काढला. Beed News : भावकीच्या वादातून तरुणावर हल्ला, रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार 'देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम सुरू करावा, आमचाही कार्यक्रम ठरलेला आहे. दोन कार्यक्रम होतील. पंढरपूरच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलेला नाही. स्थानिक राजकीय समीकरणानं हा पराभव झाला आहे. जो महाविकास आघाडीसाठी धक्का आहे, असंही राऊत यांनी मान्य केलं.
First published:

Tags: Assembly Election 2021

पुढील बातम्या