...आणि संजय राऊतांनी केले योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन, 'या' निर्णयाबद्दल केले कौतुक

...आणि संजय राऊतांनी केले योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन, 'या' निर्णयाबद्दल केले कौतुक

आता छत्रपती शिवाजी महाराज उत्तर प्रदेशच्या राजकीय मैदानात उतरवले जातील. म्हणजे आधी श्रीराम आता छत्रपती शिवाजी महाराज!

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : 'आग्रा दरबारात पुन्हा छत्रपती शिवाजीराजे पोहोचले व त्यांनी औरंगजेबाच्या हातातली तलवार खेचून घेतली असेच नाट्य जणू घडत आहे. आग्य्रातील ‘मुगल म्युझियम’चे नाव मुख्यमंत्री योगी महाराजांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ केले यात श्रद्धा, आदर, तितकेच भविष्यातले राजकारण आहे', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात आग्र्याच्या म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. यावर राऊत यांनी भाष्य केले आहे.

'उत्तर प्रदेशात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम उभे राहत आहे. अयोध्येत राममंदिर उभे राहण्याइतकेच हे महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांचे स्मरण करणे हा राष्ट्रधर्म आहे.   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सोमवारी आग्रा येथे आले. आग्रा येथे बनत असलेल्या मुगल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणाच त्यांनी केली. देशाचा ‘महानायक’ मुगल कसा असू शकतो? तो हिंदुपदपातशहाच असू शकतो. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. उत्तर प्रदेशात गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना स्थान नाही हे त्यांनी दाखवून दिले. यामागे थोडी राजकीय विचारांची ठिणगी असायला हवी', असं राऊत म्हणाले.

राजकारणातली मोठी बातमी, IPS अधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न

तसंच, उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाणे खणखणीत पद्धतीने वाजवले. आंबेडकर महाराष्ट्राचे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे स्मरण केल्याशिवाय महाराष्ट्रात राजकीय सूर्य उजाडत नाही, पण महाराष्ट्रात आंबेडकरवादी पक्षांनी स्वतःचे इतके अधःपतन आणि हसू करून घेतले की, ‘निवडणुकीत मते कापणारी मंडळी’ हीच त्यांची ओळख झाली आहे, असे आता जनतेचे मत बनले आहे.  बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना महाराष्ट्रात काही ठिकाणी रिपाइं उमेदवारांपेक्षा जास्त मते पडतात, असा टोला राऊत यांनी आठवले यांचे नाव न घेता लगावला.

'आंबेडकर हे महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशच्या राजकारणात जाऊन स्थिरावले त्यास कारणे आहेत. इथला आंबेडकरी पक्ष महाराष्ट्राला शिव्या देणाऱ्य़ा ‘कंगना’ नावाच्या नटीच्या ‘झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला विमानतळावर पोहोचला. ज्या आंबेडकरांनी ‘‘मुंबई महाराष्ट्राचीच’’ असे ठणकावून सांगितले, त्या मुंबईस ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्या नटीच्या स्वागतास  ‘आंबेडकरी’ विचारांचा एक पक्ष पोहोचतो हा आंबेडकरांचा अपमान आहे' असं म्हणत राऊत यांनी पुन्हा एकदा रामदास आठवलेंना फटकारून काढले.

सुशांतची आत्महत्या की हत्या? आज एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनंतर होणार खुलासा

'महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक अद्यापी उभे राहिलेले नाही. डॉ. आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन आता झाले आहे. शिवरायांचे गडकिल्लेही जीर्ण अवस्थेत पोहोचले आहेत. या सगळय़ात योगी महाराजांनी ‘मुगल म्युझियम’चे नाव बदलून फक्त ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ केले. याचे राजकीय पडसाद उमटतील. यापूर्वी महाराष्ट्राचे डॉ. आंबेडकर व आता छत्रपती शिवाजी महाराज उत्तर प्रदेशच्या राजकीय मैदानात उतरवले जातील. म्हणजे आधी श्रीराम आता छत्रपती शिवाजी महाराज! 2014 च्या निवडणुकीत मोदी यांच्या बरोबरीने शिवाजी महाराजांचे छायाचित्र वापरून मते मागितलीच गेली होती. छत्रपतींचे आशीर्वाद आम्हालाच असा प्रचार तेव्हा झाला. आता उत्तर प्रदेशात राममंदिर व शिवाजीराजे म्युझियम यांना महत्त्व येईल', असंही राऊत म्हणाले.

राज्यसभेत आज शेती विधेयक,सेनेचा पाठिंबा; काँग्रेस-राष्ट्रवादी काय घेणार भूमिका?

पण, 'आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने म्युझियम उभे राहणे हे ऐतिहासिक कार्य आहे. ज्या दरबारात छत्रपतींनी स्वाभिमानाचे बंड केले, त्याच दरबारात घुसून छत्रपतींनी औरंगजेबाच्या हातातील तलवारच जणू खेचून घेतली! मुख्यमंत्री योगींना सुचले व त्यांनी ते केले, असं म्हणत राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Published by: sachin Salve
First published: September 20, 2020, 10:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या