'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'

'विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी कधीतरी फुटतातच'

सामनाच्या अग्रलेखातून गुजरात मॉडेल, नोटबंदी, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : ‘विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी वेळ येताच ते फुटतात. महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये नेहमीच व्यापार-उद्योगात प्रगतशील मानली जातात, पण औद्योगिक प्रगतीत कर्नाटकने गुजरात आणि महाराष्ट्राला मागे टाकले आहे,’ असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून गुजरात मॉडेल, नोटबंदी, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे. तसंच पुतळ्यांवर होणाऱ्या खर्चावरून सरकारला खडेबोल सुनावण्यात आले आहेत.

पुतळ्यांवरून सरकारवर हल्लाबोल

‘गुजरातेत साडेचार हजार कोटी इतका सरकारी निधी वापरून पटेलांचा पुतळा उभा केला. तसा महाराष्ट्रात साडेतीन हजार कोटी रुपये सरकारी खर्चाने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहणार आहे, पण त्यास मुहूर्त सापडत नाही. पुतळे उभारले तरी आर्थिक, औद्योगिक पातळीवर दोन्ही राज्ये मागे पडत आहेत व बाजूच्या कर्नाटकने गरुडझेप घेतली,’ असं म्हणत सामनाने सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला.

‘गुजरात मॉडेल संशयात’

‘गुजरातमध्ये गुंतवणूकदारांची संख्या घटली आहे. त्यामुळे गुजरात विकासाचे ‘मॉडेल’ संशयाच्या भोवऱयात सापडले आहे. गुजरात व महाराष्ट्र ही जुळी भावंडे आहेत. त्यामुळे जुळय़ांचे दुखणे महाराष्ट्रालाही भोगावे लागत आहे,’ असं म्हणत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच टीका केली आहे.

‘नोटबंदीमुळे व्यापारी संपला’

‘मुंबईतील अनेक व्यापार, मुख्यालये, डायमंड बाजार अहमदाबाद, बडोदा, सुरतला नेल्याची सूज तेथे दिसत आहे. पण नोटाबंदी, जीएसटीमुळे तेथील ‘टेक्स्टाईल’ व्यापारी संपला. गुजरातची अर्थवाहिनी मुंबई आहे. मुंबईचे शोषण अनेक मार्गांनी सुरूच असते, पण या लुटमारीत मुंबईचे औद्योगिक महत्त्व कमी झाले. मुंबईतील मोठे उद्योग बंद पडले,’ असंही सामनाच्या अग्रलेख म्हणण्यात आलं आहे.

मृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...!

First published: November 13, 2018, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading