‘...म्हणून भाजपचं ढोंग उघडं पडलं,’ सामनातून बोचरी टीका

‘...म्हणून भाजपचं ढोंग उघडं पडलं,’ सामनातून बोचरी टीका

शबरीमाला मंदिराबाबत एक व इतर मंदिरांत महिला प्रवेशाबाबत दुसरी भूमिका, हे कसे? असा सवाल करत सामनातून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : भाजप महाराष्ट्रातील शनिशिंगणापूरच्या मंदिराबाबत एक आणि केरळातील शबरीमाला मंदिराबाबत दुसरी भूमिका घेत आहे. भाजपचे हे ढोंग आता पडले आहे, असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवण्यात आला आहे.

‘सर्व मंदिरांत महिलांनी घुसावे असं सांगणाऱ्यांनी शबरीमाला मंदिरात महिलांना जाण्याचा अधिकार नाही व न्यायालयाने यात पडू नये असे सांगावे हे ढोंग आता उघडे पडले,’ असं म्हणत सामनातून भाजपच्या मंदिरांविषयीच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.

‘शबरीमाला प्रकरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरळ न्यायालयास आव्हान देण्याची भूमिका घेतली. लोक स्वीकारतील असेच निर्णय न्यायालयांनी द्यावेत असे त्यांनी सांगितले, पण त्यामुळे महाराष्ट्रात घडलेल्या अशा दोन घटनांवर प्रकाश पाडणे गरजेचे आहे. शबरीमाला मंदिराबाबत एक व इतर मंदिरांत महिला प्रवेशाबाबत दुसरी भूमिका, हे कसे? असा सवाल करत सामनातून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.

अमित शहा यांनी काय म्हटलं होतं?

शबरीमलाचा वाद पेटलेला असताना भाजप अध्यक्ष अमित शहांनी त्यावर जाहीर वक्तव्य केलं. भाजपचा कार्यकर्ता अय्यपा भक्तांसोबत खंबीरपणे उभा आहे, असं शहा यांनी स्पष्ट केलं होतं.

देशात अनेक मंदिरं अशी आहेत, जिथे पुरुषांना प्रवेश नाही, काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही. प्रवेश दिल्यानं स्त्री-पुरुष समानता सिद्ध होत नसते, असंही शहा म्हणाले होते.

VIDEO: 51 वर्षांच्या माधुरीचा डान्स पाहिल्यावर तुम्ही पुन्हा तिच्या प्रेमात पडाल

<iframe class="video-iframe-bg-color" onload="resizeIframe(this)" id="story-314174" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzE0MTc0/"></iframe>

First published: November 4, 2018, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading