Home /News /mumbai /

आसामी पाहुणचाराची शिवसेना आमदारांनी ठेवली जाणीव, गुवाहाटी सोडण्यापूर्वी जिंकलं मन!

आसामी पाहुणचाराची शिवसेना आमदारांनी ठेवली जाणीव, गुवाहाटी सोडण्यापूर्वी जिंकलं मन!

आसाम नैसर्गिक आपत्तीला सामोरं जात असताना शिंदे गटानं (Eknath Shinde) फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाहुणचार घेणं किती योग्य आहे, असा प्रश्न विचारला जात होता.

    मुंबई, 29 जून : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आव्हान देत सुरतमार्गे गुवाहाटी गाठलं. गेली आठवडाभर गुवाहाटीमध्येच शिंदे गटाचा मुक्काम होता. शिंदे गटातील आमदार गुवाहाटीमध्ये मुक्कामी असतानाच आसाममध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. आसाम नैसर्गिक आपत्तीला सामोरं जात असताना शिंदे गटानं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाहुणचार घेणं किती योग्य आहे, असा प्रश्न विचारला जात होता. महाविकास आघाडीमधील नेत्यांनी या प्रश्नावर शिंदे गटावर टीका केली होती. एकनाथ शिंदे यांचा गट आता गुवाहाटीहून मुक्काम हलविणार आहे. विधानसभेत होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावासाठी शिंदे गट गुरूवारी मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.'आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय,' शिंदे यांनी जाहीर केला आहे. शिंदे गटाचा पुढील मुक्काम गोव्यात एकनाथ शिंदे यांनीच आता आम्ही महाराष्ट्राकडे रवाना होणार आहोत असं जाहीर केलं आहे. मात्र, गुरुवारी बहुमत चाचणी असल्यामुळे आमदारांना सुरक्षेच्या कारणास्तव गोव्यामध्ये ठेवले जाणार आहे. गोव्या भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आमदारांना गोव्यात ठेवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यामध्ये आमदारांसाठी हॉटेलही बुक करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूरमधील काही लोकांची आधार कार्ड वापरून गोव्यातील हॉटेलमध्येे रूम बुक केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपालांचे आदेश राफेलपेक्षा जास्त वेगाने, त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल; संजय राऊतांचा टोला गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे हे सकाळीच कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहोचले होते.'सर्व आमदारांना घेऊन आम्ही बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आहोत. सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करु'अशी माहिती शिंदेंनी दिली होती.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Assam, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या