मुंबई, 10 डिसेंबर : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीने सलग 5 तास चौकशी केली आहे. या चौकशीला सामोरं गेल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ईडी कार्यालयात नेमकं काय घडलं, याबाबतची माहिती दिली आहे. तसंच आता पुन्हा चौकशीसाठी यावं लागणार नाही, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
'आता पुन्हा EDच्या चौकशीला यावं लागणार नाही. जर काही प्रश्न असतील तर जेव्हा बोलावण्यात येईल त्यावेळी मी तात्काळ दोन तासात हजर होईल. तसेच माझ्या कुटुंबियांमधील कुणालाही आता चौकशीला बोलवण्याची आवश्यकता नाही. खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्न-उत्तरे झाली. घोटाळा करणाऱ्यांना कडक शासन झालं पाहिजे,' असंही प्रताप सरनाईक म्हणाले.
प्रताप सरनाईक यांच्याबाबत काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय?
सुप्रीम कोर्टाने प्रताप सरनाईक यांना नुकताच दिलासा दिला. यावेळी कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे की, 'कोणतीही कारवाई ही सूडबुद्धीने कुरू नये असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. जेव्हा प्रताप सरनाईक यांची चौकशी होईल तेव्हा सरनाईक यांच्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये चौकशीची व्हिडियोग्राफी करता येईल. मात्र चौकशी दरम्यानकोणताही आवाज वकीलांना ऐकू येणार नाही, फक्त ती दृश्य पाहता येतील, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेश म्हटलं होतं.