मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ

प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ


ED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही  प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

ED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

ED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

ठाणे, 25 नोव्हेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे (Shivsena)  आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) यांना  अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED) ने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. पण, प्रताप सरनाईक हे कोविड 19 च्या नियमानुसार क्वारंटाइन झाले आहे.

ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडून ईडीला विनंती करण्यात आली आहे.

मुंबई बाहेरून आल्यामुळे कोविड 19 नियमांनुसार आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन झाले आहे. त्यांनी ED ला विनंती केली आहे की, विहंग सरनाईक यांच्या पत्नी हायपर टेंन्शनमुळे ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यामुळे विहंग त्याच्या पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे विहंग आणि मला पुढच्या आठवड्यात एकत्र चौकशीसाठी ED ने बोलवावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी ED च्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही  प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. त्याचबरोबर सरनाईक यांच्या भागिदाराची माहिती आणि विनंती पत्र हे थोड्याच वेळात त्यांचे मेव्हणे ED कार्यालयात देणार आहे.

24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी

प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.  सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. आता सरनाईक हे क्वारंटाइन झाले आहे, त्यामुळे ईडी काय भूमिका घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published:
top videos