विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई, 19 जानेवारी : उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सोबतीने सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदारही आले, ज्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आगामी निवडणुकांमध्येही शिवसेना-भाजप युती एकत्र लढेल आणि निवडणुका जिंकेल, असा विश्वास दोन्ही पक्षांचे नेते व्यक्त करत आहेत, पण स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधला वाद समोर आला आहे. या वादाचं रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झालं आहे.
मुंबईतील मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आधीच्या ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रकाश सुर्वे यांचे आधीचे ड्रायव्हर बिभीषण वारे यांनी काहीच दिवसांपूर्वी प्रकाश सुर्वे यांचं काम सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे वारे यांच्यावर प्रकाश सुर्वेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं बोललं जात आहे.
बिभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला असतानाही पोलिसांनी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.